घरताज्या घडामोडीCoronavirus होतोय दिवसेंदिवस चलाख, म्युटेशनला रोखण्यासाठी नाही अस्त्र - डॉ. पॉल

Coronavirus होतोय दिवसेंदिवस चलाख, म्युटेशनला रोखण्यासाठी नाही अस्त्र – डॉ. पॉल

Subscribe

देशात एका बाजूला कोरोनाची दुसरी लाट मंदावत आहे. अनेक राज्यांमधील परिस्थिती पूर्ववत होत आहे. परंतु अशा परिस्थितीत लोकांचा हलगर्जीपण नुकसान पोहोचवू शकतो. कोरोना व्हायरस खूप चलाख झाला आहे. व्हायरसच्या म्युटेशनला रोखण्यासाठी आपल्या जवळ कोणतेही अस्त्र नाही आहे. व्हायरस आपोआप आक्रमक रुप धारण करत आहे. यापासून वाचवण्याचा उपाय प्रत्येकाकडे आहे, असे नीति आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल म्हणाले. मंगळवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. पॉल म्हणाले की, व्हायरसचे आपल्या प्रवृत्तीला सोडले नाही आहे. पण जर लोकं सावध राहिले नाही तर भविष्य खूप हानीकारक ठरू शकते.

डॉ. पॉल यांनी स्पष्ट शब्दांमध्ये सांगितले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत डेल्टा व्हेरियंटने सर्वात जास्त कहर केला. ऑक्सिजनसाठी वणवण फिरावे लागले, रुग्णालयात बेड्सची कमतरता भासू लागली, औषधाचा काळबाजार होऊ लागला. त्यामुळे आपल्याला हे विसरायला नाही पाहिजे. व्हायरसचे नवं-नवीन व्हेरियंट आणि म्युटेशन समोर येत आहेत. वैज्ञानिकांची यावर नजर कायम आहे, परंतु जनतेने देखील नियमांवर विश्वास ठेवला पाहिजे. तोंडावर मास्क लावला पाहिजे. बाजारातील गर्दीपासून दूर राहणे आपली पहिली जबाबदारी आहे. कोणत्या दुकानावर उभे असाल तरीही आपल्या नंबर येईपर्यंत वाट पाहिली पाहिजे. जर हे सर्व नाही केले तर खूप नुकसान होऊ शकते.

- Advertisement -

डेल्टा प्लस व्हेरियंटबाबत काय म्हणाले डॉ. पॉल?

डेल्हा प्लस व्हेरियंटबाबत माहिती मिळाली आहे. सरकारच्या राष्ट्रीय टीम या बदलावर नजर ठेवून आहे. परंतु सध्या हा व्हेरियंट किती गंभीर आहे आणि त्याच्या वेग किती आहे याबाबतची माहिती नाही आहे, असे डॉ. पॉल म्हणाले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह कुमार अग्रवाल म्हणाले की, व्हायरस बदलत आहे आणि पुढे देखील बदलेल. परंतु यापासून वाचण्यासाठी काही मार्ग आहेत. सतत लोकांना हे उपाय करण्यासाठी विनंती करत आहे. यामध्ये लसीकरणाचा देखील समावेश आहे. त्यामुळे लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. म्हणून तोपर्यंत लोकांना संयम बाळगावा लागेल. आपल्याला स्वतःचे आणि संपूर्ण कुटुंबाचे संरक्षण करावे लागेल.


हेही वाचा – Coronavirus: डेल्टा व्हेरियंटमुळे लोकांना दुप्पट वेगाने होतोय कोरोनाचा संसर्ग, अभ्यासातून नवा

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -