घरताज्या घडामोडीराणे केंद्रीय मंत्री झाले अन् कोकणावर संकट आलं, गुलाबराव पाटील यांचं नारायण...

राणे केंद्रीय मंत्री झाले अन् कोकणावर संकट आलं, गुलाबराव पाटील यांचं नारायण राणेंना प्रत्युत्तर

Subscribe

संकटात सापडलेल्यांना तातडीनं मदत करायला हवी ही वेळ राजकारण करण्याची नाही.

राज्यात मुसळधार पावसानं हाहाकार घातला होता यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूणमधील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यात संकट आलं असल्याचे म्हटलं आहे. यावर शिवसेनेकडून प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर निशाणा साधत राणे केंद्रीय मंत्री झाल्यानंतर कोकणावर संकट आलं असल्याची टीका केली आहे. राज्यातील पूर परिस्थितीवरुन राजकीय मंडळींमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत.

शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी नारायण राणे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर राज्यात संकट आलं आहे. अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे. परंतू नारायण राणे केंद्रीय मंत्री झाले आणि कोकणावर संकट आलं म्हणजे राणेच पांढऱ्या पायाचे आहेत. अशी खोचक टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे. सध्या राज्यातील परिस्थिती चिंताजनक आहे. संकटात सापडलेल्यांना तातडीनं मदत करायला हवी ही वेळ राजकारण करण्याची नाही. राजकारण करण्यासाठी अनेक मुद्दे आहेत. जेव्हा वेळ असते तेव्हा तुमचा झेंडा घेऊन उतरा आम्ही आमचा झेंडा घेऊन राजकारणात उतरु असे वक्तव्य शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.

- Advertisement -

नारायण राणे यांचं वक्तव्य

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चिपळूणमधील पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी नारायण राणे यांना राज्यात मागील दोन वर्षांपासून सतत संकट येत आहेत असा प्रश्न करण्यात आला होता यावर राणेंनी उत्तर दिलं आहे. राज्यातील भयावह परिस्थितीला मुख्यमंत्री जबाबदार आहे. याला कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा पायगुण आहे. आल्यापासून वादळ, पाऊस सर्व सुरु आहे. कोरोना त्यांची देण असल्याचा टोला नारायण राणे यांनी लगावला आहे. मुख्यमंत्री आले कोरोना घेऊन आले पाय बघायला पाहिजे, पांढऱ्या पायाचा अशी खोचक टीका नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -