घरताज्या घडामोडीcruise drug bust : जावयावर झालेल्या कारवाईमुळे नवाब मलिकांचा NCBवर पोटसूळ, दरेकरांची...

cruise drug bust : जावयावर झालेल्या कारवाईमुळे नवाब मलिकांचा NCBवर पोटसूळ, दरेकरांची टीका

Subscribe

एनसीबीच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करुन जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करणे हे योग्य नाही

एनसीबीने कॉर्डेलिया क्रूझरवर केलेल्या कारवाईमध्ये भाजपचे कार्यकर्ते होते याचा खुलासा करुन अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. परंतु नवाब मलिकांच्या जावयावर एनसीबीने कारवाई केली आहे. याचा मलिकांना पोटसूळ असल्यामुळे एनसीबीच्या कारवाईवर आरोप करण्यात येत असल्याची टीका विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणेवर अशी भूमिका घेणं हे घातकी असल्याचे दरेकरांनी म्हटलं आहे. अरबाज मर्चंटला अटक करणारा मनीष भानूशाली भाजपचा उपाध्यक्ष असून ही कारवाई महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी करण्यात येत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

एनसीबीच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करुन जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करणे हे योग्य नाही असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. दरेकरांनी म्हटलं आहे की, राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे आणि एनसीबीचे नाते सर्वश्रृत आहे. त्यांच्या जावयाच्या बाबतीत जे झालं आहे त्यामुळे एनसीबीच्याबाबतीत पोटसूळ संताप नवाब मलिक यांच्या मनात आहे. तो वारंवार संधी मिळाली का कढण्याचा प्रयत्न करत आहेत. एनसीबीने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे असे प्रवीण दरेकर यांनी सागितलं.

- Advertisement -

एनसीबी सारख्या तपास यंत्रणेवर वारंवार संशय करणं, आरोप करणे आणि त्यांच्याविषयी जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करणे योग्य नाही. आपल्या देशातील ज्या विश्वासहार्य तपास यंत्रणा आहेत त्यामध्ये एनसीबी आहे. अमली पदार्थांसारख्या जबरदस्त विळख्यात देश येऊ नये म्हणून हे खातं तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या भूमिका या महत्वाच्या खात्याच्या बाबत घेणं हे घातकी असल्याचे वाटत आहे असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

नवाब मलिकांचा भाजपवर आरोप

एनसीबीच्या कारवाईत आर्यन खान आणि अरबाज मर्चंटला खेचत एनसीबी कार्यालयात नेणारा हा एनसीबीचा अधिकारी नसून भाजपचा कार्यकर्ता आहे. मनीष भानूशाली भाजप उपाध्यक्ष राहिले आहेत. तसेच त्याचे भाजपच्या बड्या नेत्यांसोबत देखील फोटो आहेत. एनसीबीने कारवाईदरम्यान भाजप नेत्याच्या नातेवाईकाला सोडले असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला असून शनिवारी याबाबत सविस्तर माहिती देणार असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. त्यामुळे हा नातेवाईक कोण आहे? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.


हेही वाचा : NCB ने भाजप नेत्याच्या मेव्हण्याला सोडलं, ‘त्या’ व्यक्तीचा उद्या पर्दाफाश करणार- नवाब मलिक


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -