घरताज्या घडामोडी...काही काळ संपर्क होणार नाही' लवकरच भेटू, खासदार अमोल कोल्हेंची अज्ञातवासाची पोस्ट...

…काही काळ संपर्क होणार नाही’ लवकरच भेटू, खासदार अमोल कोल्हेंची अज्ञातवासाची पोस्ट चर्चेत

Subscribe

मागील काही दिवस, वर्षांपासून बेभान होऊन धावत राहिलो मात्र आता वेळ आली आहे, एकांतवासात जाण्याचे असे राष्ट्रवाकी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी आपल्या सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. अमोल कोल्हे यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे. त्यांच्या पोस्टवर अनेकांनी आपले मतही मांडले आहे. आतापर्यंतच्या धावपळीत अनेक टीका केल्या टोकाचे निर्णय घेतले तसेच अनपेक्षित पावलं उचलले असल्याचे अमोल केल्हेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या पोस्टवरुन राजकीय वर्तुळातही चर्चा सुरु झाल्या आहेत.

खासदार अमोल कोल्हे यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट करत एकांतवासात जात असल्याची माहिती दिली आहे. अमोल कोल्हे विद्यमान खासदार असून त्यांची वक्त़ृत्वावर चांगली पकड आहे. आपल्या वक्तेपणामुळे ते अनेकांना आवडतात. मागील काही दिवसांपासून कोल्हे अनेक बैठका, सभांना उपस्थित राहिले आहेत. मात्र त्यांनी केलेल्या पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

- Advertisement -

खासदार अमोल कोल्हे यांनी आपल्या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, सिंहावलोकनाची वेळ, गेल्या काही दिवसांत, महिन्यात आणि वर्षात बेभान होऊन धावत राहिलो यादरम्यान काही टोकाचे निर्णयही घेतले आणि अनपेक्षित पावलं उचलली असल्याचे कोल्हेंनी कबूल केले आहे. परंतु हे सगळं जुळवताना झालेली ओढाताण, तारेवरची कसरत, वेळेची गणित, ताणतणाव यामुळे जरा थकवा आलाय. थोडा शारीरिक, बराचसा मानसिक, शारीरिक आरामाने निघून जाईल पण मानसिक थकवा घालवण्यासाठी हवं थोडं मनन आणि थोडं चिंतन, घेतलेल्या निर्णयांचा विचार आणि कदाचिक फेरविचार सुद्धा, त्यासाठीच एकांतवासात जातोय. काही काळ संपर्क होणार नाही. पुन्हा लवकरच भेटू.. नव्या जोमाने, नव्या जोशाने असे अमोल कोल्हे म्हणाले असून शेवटी त्यांनी फक्त चिंतनासाठी जातोय, चिंतनशिबिरासाठी नाही अशी टीप दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe)

- Advertisement -

हेही वाचा : ST Workers Strike: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे १६० बस डेपो बंद, प्रवाशांचे हाल

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -