घरट्रेंडिंगरावण आजही आहे; मुंबई पोलिसांचे हटके ट्विट

रावण आजही आहे; मुंबई पोलिसांचे हटके ट्विट

Subscribe

दसऱ्यानिमित्त मुंबई पोलिसांनी अनोखे ट्विट करुन मुंबईकरांना हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबई पोलीस ट्विटरवर नेहमीच सक्रिय असताना आपण पाहिले आहे. विविध सण, दिनविशेष आणि चालू घडामोडींच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जागरुकता आणण्याचे काम मुंबई पोलिसांचे ट्विटर हँडल करत असते. आज दसऱ्यानिमित्तही मुंबई पोलिसांनी एक हटके ट्विट केले आहे. “आधुनिक रावण आजही जुन्या शस्त्रांसहीत आपल्यात बाकी आहे. चांगल्याच्या बाजूने आणि वाईटाच्या विरोधात नेहमीच उभे राहावे, यासाठी मुंबईकरांना बळ मिळो.” अशा आशयाचे ट्विट केलेले आहे.

- Advertisement -

या ट्विटमध्ये महत्त्वाची आणि लक्षवेधी गोष्ट म्हणजे ट्विटसाठी वापरलेला फोटो. या फोटोत दहा मोबाईल दाखवलेले आहेत. ज्यामध्ये प्रत्येक मोबाईल लबाडी, बनवाबनवी, ब्लॅकमेलिंग, तोतयागिरी, अफवा पसरवणे, धमकावणे, द्वेष पसरवणे, पाठलाग करणे, फसवणूक आणि फोटो किंवा व्हिडिओ मॉर्फिंग असे रावणाची दहा तोंडे दाखवली आहेत.

हे वाचा – सोशल मीडियावरच्या रोमियोंपासून सावधान! मुंबई पोलिसांचा मिम्सद्वारे संदेश

मुंबई पोलिसांच्या या ट्विटवर अनेक नेटीझन्सने मुंबई पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत. ज्या तत्परतेने मुंबई पोलीस मुंबईकरांचे रक्षण करते, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे.

- Advertisement -

हे वाचा – शतकवीर पृथ्वीला मुंबई पोलिसांकडून अनोख्या शुभेच्छा

आनंद महिंद्रा यांचेही मजेशीर ट्विट

महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा सुद्धा आपल्या वेगळ्या ट्विटसाठी ओळखले जातात. यावेळीही त्यांनी एक फोटो ट्विट केला आहे, ज्यामध्ये रावण एका हॉटेलात जातो. मात्र हॉटेलबाहेर पाटी लिहिलेली असते की, पर हेड ५०० रुपये. ते पाहून रावण खट्टू होतो आणि म्हणतो हे बरोबर नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -