घरमहाराष्ट्रबारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा; परीक्षा अर्जसाठी दिली मुदतवाढ

बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा; परीक्षा अर्जसाठी दिली मुदतवाढ

Subscribe

बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अर्ज करण्याकरता आता मुदतवाढ देण्यात आली आहे. २१ ऑक्टोबरपर्यंतची मुदतवाढ आता ३० ऑक्टोबरपर्यंत देण्यात आली आहे.

यंदा बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलासा देणारी माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च २०१९ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ज्युनिअर कॉलेजमार्फत ३० ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. हा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. यंदाची बारावीची परिक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च दरम्यान होणार आहे. काही दिवसांपूर्वीच दहावी-बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले असून विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करता यावे म्हणून ऑक्टोबरमध्येच हे वेळापत्रक जाहीर करण्यात येते.

आज संपली होती मुदत

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना अडचणी येत असल्यामुळे मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेच्या म्हणजेच बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी २१ ऑक्टोबर ही मुदत देण्यात आली होती. या मुदतीत सरल डेटाबेस मधून अर्ज करताना काही ज्युनिअर कॉलेजना अडचणी आल्या होत्या. त्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

- Advertisement -

वाचा : विद्यार्थ्यांनो तयारीला लागा; दहावी-बारावी परिक्षेच्या तारखा जाहीर

शुल्क भरण्यासाठीही मुदतवाढ

तसेच ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांना चलन व शुल्क भरण्यासाठी १२ ते १७ नोव्हेंबर ही मुदत देण्यात आली आहे. चलन व शुल्क भरल्यांनतर ज्युनिअर कॉलेजना १९ नोव्हेंबरपर्यंत विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांची यादी जमा करायची असल्याचे, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी म्हटले आहे. त्यांनी प्रसिद्धी पत्रक जारी करून त्याबाबत माहिती दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -