घरताज्या घडामोडीOmicron Variant: ओमिक्रॉनपेक्षा अधिक संसर्ग पसरवणारे धोकादायक व्हेरिएंट येणार - WHO

Omicron Variant: ओमिक्रॉनपेक्षा अधिक संसर्ग पसरवणारे धोकादायक व्हेरिएंट येणार – WHO

Subscribe

ओमिक्रॉनच्या धोक्यापासून संरक्षण करायचे असेल तर कोरोना लस घेणे महत्त्वाचे आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे मत आहे.

कोरोना महामारीच्या (Corona Pandemic) सुरुवातीपासून कोरोनाची नवनवीन रुपं येऊन त्याचा अधिक धोका वाढवत आहे. कोरोनाची बेटा, अल्फा, गामा, डेल्टा अशी अनेक रुप या काळात आली. पण कोरोनाच्या डेल्टा (Delta Variant) रुपाने जगभरात अक्षरशः हाहाकार घातला. या डेल्टा रुपामुळे लाखो लोकांचे जीव गेले. कोरोनाचा सर्वाधिक धोकादायक रुप म्हणजे डेल्टा असल्याचे म्हटले जाते. त्यानंतर ओमिक्रॉनने (Omicron Variant) जगात गेल्यावर्षी प्रवेश झाला. कोरोनाचे हे रुप डेल्टापेक्षा कमी धोकादायक असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. पण आता खुद्द जागातिक आरोग्य संघटनेने (WHO) ओमिक्रॉनचे हे रुप धोकादायक असल्याचे सांगितले आहे. एवढेच नाही तर ओमिक्रॉनपेक्षा अधिक पसरणारे आणखीन कोरोनाची रुपं येण्याचा धोका आहे, असे जागातिक आरोग्य संघटनेचे प्रमुख म्हणाले आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेबेरियस (who chief tedros adhanom ghebreyesus) म्हणाले की, ‘एवढेच नाहीतर आणखी कोरोनाची नवनवीन रुपं येण्याचा धोका आहे, जी ओमिक्रॉनपेक्षा अधिक पसरू शकतात आणि जास्त जीवघेणी असू शकतात. जगातील कोरोना मृत्यूची संख्या जवळपास ५० हजार दर आठवड्याची आहे. या विषाणूसोबत जगणे याचा अर्थ असा नाही की, आपण इतक्या मृत्यूचा स्वीकार करण्यास सुरू करू.’

- Advertisement -

ओमिक्रॉनचा सर्वाधिक धोका कोणाला?

ट्रेडोस पुढे म्हणाले की, ‘डेल्टाच्या तुलनेत ओमिक्रॉन कमी गंभीर आहे, पण जास्त धोकादायक विषाणू आहे. विशेष म्हणजे त्या लोकांसाठी ज्यांनी लस घेतली नाही. जोपर्यंत आपल्या आजूबाजूचे लोकं लस घेत नाहीत तोपर्यंत या विषाणूला मोफत फिरू दिले नाही पाहिजे. आफ्रिकेमध्ये ८५ टक्के लोकांना अजूनपर्यंत लसीचा एकही डोस मिळाला नाही. त्यामुळे आपण जोपर्यंत लसीचे हे अंतर दूर करत नाही तोपर्यंत महामारी नष्ट करू शकत नाही.’


हेही वाचा – Omicron Variant: ओमिक्रॉन व्हेरिएंटवर मात करण्यास AstraZenecaचा बूस्टर डोस सक्षम

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -