घरताज्या घडामोडीपंतप्रधानांच्या कोरोना परिस्थिती आढावा बैठकीत बोलण्याची संधी दिली नाही, राजेश टोपेंनी पत्राद्वारे...

पंतप्रधानांच्या कोरोना परिस्थिती आढावा बैठकीत बोलण्याची संधी दिली नाही, राजेश टोपेंनी पत्राद्वारे दिली माहिती

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ ८ राज्यांना बोलू दिले. यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यांना बोलण्याची संधी मिळाली नाही. केंद्र सरकारला इतर राज्यांनी लेखी माहिती देण्यास सांगितले असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची कोरोना परिस्थितीवरील आढावा घेण्यासाठी बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये केवळ ८ राज्यांना बोलण्याची संधी दिली तर महाराष्ट्रासह इतर राज्यांना बोलण्याची संधी देण्यात आली नाही. केवळ ऐकण्याच्या भूमिकेत इतर राज्यांना ठेवले होते. परंतु राज्य सरकारच्या वतीने लिखीत स्वरुपात कोरोना परिस्थितीची माहिती दिली आहे. तसेच औषधांची मागणी केली असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या बैठकीनंतर सांगितले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीला गैरहजर होते पंरतु आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी उपस्थिती लावली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठकीत अनेक राज्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळाली नाही. मोदींनी केवळ ८ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलण्याची संधी दिली आहे. ज्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्या राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीला गैरहजर राहिले आहेत. त्याबद्दलची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने पंतप्रधान कार्यालयाला नियमानुसार कळवली होती. आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि इतर आरोग्य अधिकारी पंतप्रधानांच्या बैठकीला उपस्थित होते. राज्यातील कोरोना परिस्थितीची माहिती आणि औषध, लसींची मागणी करण्याची संधीच दिली गेली नाही असे राजेश टोपे म्हणाले आहेत.

- Advertisement -

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी राजेश टोपे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पोस्ट ऑपरेटिव्हमुळे बैठकीला हजर नव्हते. त्यामुळे महाराष्ट्राची कोरोना परिस्थितीची माहिती आम्ही पत्राद्वारे दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ ८ राज्यांना बोलू दिले. यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यांना बोलण्याची संधी मिळाली नाही. केंद्र सरकारला इतर राज्यांनी लेखी माहिती देण्यास सांगितले असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

केंद्र सरकारला पत्राद्वारे ट्रिटमेंट पद्धतीसाठी मार्गदर्शन करावं असे म्हटलं आहे. कोविड खर्चात तफावत असल्याचे सांगितले तसेच लिक्विड मेडिकल ऑक्सिजन २० लाख आणि मेडिकल पाईपलाईन १५ लाख आहे. परंतु जे एम पोर्टलवर त्याची किमत दुप्पट असल्यामुळे सुधारीत एसओपी द्यावी अशी मागणी केली आहे. लसीकरण हा कोरोनावर उपाय आहे. त्यामुळे राष्ट्रीय लसीकरणाचा जो प्रोग्राम सुरु आहे. त्यामध्ये ४० लाख कोव्हॅक्सीन आणि ५० लाख कोव्हिशील्ड उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी केली असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : पाटी बदलण्याचा खर्च जास्त की दुकानाच्या काचा बदलण्याचा?, मनसेचा व्यापाऱ्यांना धमकीवजा इशारा

हेही वाचा : पंतप्रधानांनी कोणत्या राज्यांना बोलण्याची संधी दिली नाही, जाणून घ्या 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -