घरताज्या घडामोडी'वेसावच्या पारुचा' आवाज हरपला,कोळी गाण्यांचे बादशहा लोकशाहीर काशीराम चिंचय यांचे...

‘वेसावच्या पारुचा’ आवाज हरपला,कोळी गाण्यांचे बादशहा लोकशाहीर काशीराम चिंचय यांचे निधन

Subscribe

काशिराम चिंचय यांचा कोळी गीतांवर एक अनोखी पकड होती. कोणताही जात, धर्म किंवा प्रांत धरुन न ठेवता त्यांच्या कोळी गीतांवर आणि गाण्यांच्या ठेक्यावर त्यांनी सर्वांना ठेका धरायला भाग पाडले

पारू गो पारू वेसावचे पारू (Paru go Paru Vesavchi Paru )   हे गाणे सातासमुद्रापार नेऊन अजरामर करणारे लोकशाहीर काशीराम चिंचय यांचे शुक्रवारी निधन झाले. ( Lokshahir Kashiram Chinchay passed away)  ते ७१ वर्षांचे होते. त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्यामागे त्याची पत्नी हेमा, मुलगा सचिन आणि तीन कन्या आहेत. शुक्रवारी दुपारी 1 वाजचा त्यांच्यावर वेसावे स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. गेले अनेक दिवस काशीराम चिंचय हे आजारी होते. त्यांना उपचारांसाठी अंधेरी येथील ब्रम्हकुमारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  त्यांनतर त्यांना परळच्या केइम रुग्णालयात हलविण्यात आले मात्र उपचारांती त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जाण्याने तमाम कोळी बांधवांवर शोककळा परसली आहे.

कोळी गाण्यांचे बादशहा

लोकशाहीर काशीराम चिंचय यांना कोळी गाण्यांचे बादशहाचा हा किताब त्यांच्या नावे होता. हजारो कोळी गीतांना काशीराम यांचा दमदार आवाज लाभला आहे. पारू गो पारू वेसावची पारू हे त्यांचे विशेष गाजले आणि या गाण्याने अटकेपार झेंडा रोवला. तब्बल पाच दशके त्यांनी कोळी गीतांसाठी आपले मोलाचे योगदान दिले आहे. काशिराम चिंचय यांनी वेसावकर आणि मंडळी या त्यांच्या कलापथकाद्वारे अनेक कोळी गीत केली.

- Advertisement -

हे अल्बम आजही लोकप्रिय

काशिराम चिंचय यांचा कोळी गीतांवर एक अनोखी पकड होती. कोणताही जात, धर्म किंवा प्रांत धरुन न ठेवता त्यांच्या कोळी गीतांवर आणि गाण्यांच्या ठेक्यावर त्यांनी सर्वांना ठेका धरायला भाग पाडले. वेसावची पारू, दर्या भरला, वेसावकरांची धम्माल, हिरोंची धम्माल यासारख्या त्यांच्या अल्बमधील अमिताभ बच्चन आणि त्यांच्या आवाजातील संवाद आजही अनेकांच्या लक्षात आहेत. यात प्रसिद्ध गायक सुदेश भोसले त्यांना साथ देत असत.

मी हाय कोलीवर नाचले होते ओबामा

काशिराम चिंचय यांचे ‘मी हाय कोली’ हे अजरामर गाणे आजही थिरकायला भाग पाडते. अनेक लग्न, हळदी किंवा कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमाला मी हाय कोली या गाण्यावर लहानांपासून मोठ्यांपर्यंत मंडळी थिरकता दिसतात. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा जेव्हा मुंबई दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांनी मी हाय कोली या गाण्यावर पत्नीसह ठेका धरला होता.

- Advertisement -

सुप्रसिद्ध लोकशाहीर आणि पारंपारिक कोळी नाचगाण्यांचा बादशाह काशिराम लक्ष्मण चिंचय (७१) यांचे आज दु:खद निधन झाले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. मी चिंचय कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे म्हणत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.


हेही वाचा – Instgram वर 15 मिलियन फॉलोअर्स असलेला पहिला साउथ सुपरस्टार बनला Allu Arjun

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -