घरताज्या घडामोडीUS Airport 5G : अमेरिकेत एअरपोर्टनजीक ५ रोलआऊटला ब्रेक ! एअर इंडियासह...

US Airport 5G : अमेरिकेत एअरपोर्टनजीक ५ रोलआऊटला ब्रेक ! एअर इंडियासह अनेक फ्लाईट्स रद्द

Subscribe

अमेरिकेत आजपासून ५ जी टेक्नॉलॉजी (5G communications) अंमलात येत असल्याची घोषणा करण्यात आली होती. पण फ्रिक्वेन्सीच्या मुद्द्यावर मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला होता. त्यामुळेच अमेरिकेतील ५ जी रोलआऊट काही काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. या ५ जी रोलआऊटमुळे मोठ्या प्रमाणात विमान सेवेच्या फ्लाईट्सवर परिणाम होणार आहे. एअर इंडियानेही भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या सेवेत बदल केला आहे.

एअर इंडियाच्या फ्लाईट्स रद्द

एअर इंडियानेच याबाबतची माहिती जाहीर केली आहे. दुबईच्या एमीरात एअयरलाइननेही मंगळवारी अमेरिकेत जाणाऱ्या अनेक फ्लाईट्स रद्द करत असल्याची घोषणा केली आहे. अमेरिकन सरकारच्या ५ जी रोलआऊट योजनेमुळे विमान सेवेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता एयरलाइन कंपन्यांनी व्यक्त केली आहे. आम्ही आमच्या सुरक्षा व्यवस्थेशी कोणतीही तडजोड करणार नाही, असे एअरलाईन कंपन्यांकडून जाहीर करण्यात आले आहे. एअर इंडियानेही भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या फ्लाईट्सची संख्या कमी केली आहे. एअर इंडियाने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

- Advertisement -

एअर इंडियाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, अमेरिकेत ५ जी टेक्नॉलॉजीच्या अंमलबजावणीमुळे भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या सेवांमध्ये बदल करण्यात आले आहेत. या सेवांमध्ये १९ जानेवारी २०२२ पासून बदल करण्यात येत आहेत. तसेच विमानाच्या प्रकारातही बदल करण्यात येत आहेत. याबाबतची माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही कंपनीने जाहीर केले आहे. अमेरिकेत आजपासून ५ जी टेक्नॉलॉजीला सुरूवात होणार होती. पण काही तांत्रिक कारणाने हा रोलआऊट थांबवण्याचा निर्णया जो बायडन प्रशासनाने घेतला आहे. ५ जी तंत्रज्ञानाचा परिणाम हा मोठ्या प्रमाणात फ्लाईट्सवर होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

बायडन प्रशासन नमले 

काही महत्वाच्या एअरपोर्टजवळ काही ५ जी सेवेचे वायरलेस टॉवर्स हे काही काळासाठी अंमलात येणार नाहीत. त्याचा परिणाम अमेरिकेत येणाऱ्या फ्लाईट्सवरही होऊ शकतो. त्यामुळेच एअरपोर्टनजीक या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय घेतल्याचे जो बायडेन प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. जो बायडन यांनी केलेल्या खुलाशानुसार प्रवासी वाहतूक, कार्गो ऑपरेशन, आर्थिक रिकव्हरी यासारख्या गोष्टींनी अडथळा येऊ नये म्हणून आम्ही ५ जी रोलआऊटचा निर्णय टाळतो आहोत. पण उर्वरीत ९० टक्के ठिकाणी वायरलेस टॉवरची अंमलबजावणी ही नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच होईल, असेही बायडन यांनी स्पष्ट केले.

विमानांना ५ जी तंत्रज्ञानाचा धोका काय?

अमेरिकेत अंमलात येणारे ५ जी तंत्रज्ञान हे विमानातील रेडिओ ऑल्टीमीटरच्या कामावर परिणाम करते. विमानाच्या अल्टीट्यूट म्हणजे उंचीबाबतची माहिती देण्यासाठीची ही महत्वपूर्ण यंत्रणा आहे. एअरलाइन कंपन्यांनी केलेल्या मागणीनुसार ज्याठिकाणी एअरपोर्टपासून ५ जी टॉवर्स दूरच्या परिसरात आहेत, अशाच ठिकाणी या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. अशा ५ जी टॉवर्सचा परिणाम हा अमेरिकेतील फ्लाईट ऑपरेशनवर होऊ शकतो, अशी शक्यता अनेक कंपन्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळेच अमेरिकेतील एअरलाईन कंपन्यांनीही बाइडन प्रशासनाला यामध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी करत या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी काही कालावधी टाळण्याची विनंती केली होती.

विमानाच्या फ्रिक्वेन्सीवरही परिणाम

या नव्या तंत्रज्ञानामुळे विमानाच्या फ्रिक्वेन्सीवरही परिणाम होण्याची शक्यता कंपन्यांनी वर्तवली होती. तसेच लो व्हिजिबिलिटीमध्ये विमानाच्या ऑपरेशनवरही परिणाम होऊ शकतो असा अंदाज एअरलाईन कंपन्यांनी व्यक्त केला होता. या नव्या तंत्रत्रानाच्या अंमलबजावणीला विरोध करणारे पत्र जवळपास १० कंपन्यांनी लिहिले होते. AT&T (T.N) and Verizon Communications च्या माध्यमातून हे ५ जी तंत्रज्ञान अंमलात येणार होते. पण या कंपन्यांनी तात्पुरत्या कालावधीसाठी ही अंमलबजावणी करण्याचे टाळले आहे. फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) नेही याबाबतचा अलर्ट बायडन प्रशासनाला दिला होता.

FAA ने दिला होता अलर्ट !

डेल्टा एअरलाईन्सने स्पष्ट केले आहे की वायरलेस तंत्रज्ञान ही सकारात्मक बाब असली तरीही आम्ही काही फ्लाईट्सचे ऑपरेशन बंद ठेवतो आहे. FAA नेही याआधी रेडिओ अल्टीमीटर्स आणि लो व्हिजिबिलिटी ऑपरेशनवरही याचा परिणाम होऊ शकतो. नव्या तंत्रज्ञानाचा परिणाम एअरपोर्ट नजीकच्या ५०० एअरपोर्टवर होणार होता. एअर इंडिया आणि जपानच्या एअरलाईनने मोठ्या प्रमाणात फ्लाईट्स याच कारणामुळे रद्द केल्या आहेत.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -