घरताज्या घडामोडीSantosh Parab Attack Case: नितेश राणेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी

Santosh Parab Attack Case: नितेश राणेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी

Subscribe

संतोष परब हल्लाप्रकरणात कणकवली दिवाणी न्यायालयाने महत्त्वाचा दिला आहे. भाजप आमदार नितेश राणे यांना ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी कणकवली दिवाणी न्यायालयाने नितेश राणेंना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र त्यानंतर सरकारी वकील आणि पोलिसांकडून १० दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली. मग तासाभराच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने नितेश राणे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सरकारी वकील ॲड. प्रदीप घरत काय म्हणाले?

याप्रकरणातील सरकारी वकील ॲड. प्रदीप घरत एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, ‘अगोदर जी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली होती, ती न्यायालयाने युक्तीवादानंतर दिली नव्हती. तर आरोपीने शरणागती पत्करल्यानंतर त्याला ते ताब्यात घेणे होते. ताब्यात घेतल्यानंतर त्यांना कुठे ठेवायचे? हा जो प्रश्न न्यायालयासमोर होता. त्यात त्यांना आमचे म्हणणे ऐकणे भाग होते. पोलीस कोठडीसाठी आम्ही केलेला युक्तीवाद न्यायालयाला पटलेला आहे. न्यायालयाने आमचे म्हणणे ऐकून घेतले आहे. आरोपीचे म्हणणे याबाबत ऐकून घेतले नाही. तसेच याप्रकरणातील दुसरा आरोपी पीए आहे, त्याची कोठडी ४ तारखेपर्यंत असल्यामुळे नितेश राणेंना ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ४ फेब्रुवारीला दोघांना एकत्र न्यायालयासमोर उभे केले जाईल. जर आम्ही याप्रकरणातील तपासात योग्य प्रगती करू शकलो, तर आम्ही यापुढे त्यांची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी करू.’

- Advertisement -

नितेश राणेंचे वकील काय म्हणाले? 

नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘न्यायालयात आम्ही स्वतः शरण जाण्याचा अर्ज दिला होता. न्यायालयाने आमचा शरण जाण्याचा अर्ज मंजूर केला आणि न्यायालयीन कोठडी दिली. त्यानंतर न्यायालयाने पोलिसांना जे काही मांडायचे असेल ते तातडीने तुम्ही मांडा अशी नोटीस दिली. त्यामध्ये पोलिसांनी विविध कारणे देऊन १० दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. त्यावेळी आमच्या बाजूने युक्तीवाद केला की, ‘जवळपास नितेश राणे यांनी ५ दिवस ५ वेळा पोलीस स्टेशनला हजेरी लावून आपला जबाब नोंदवला आहे. तसेच नितेश राणेंचा फोन पोलिसांना जप्त करायचा होता, त्यासंदर्भात देखील त्यांनी सहकार्य करण्याची तयार दाखवली होती.’ बरेच मुद्दे मांडल्यानंतर नितेश राणेंना पोलीस कोठडी दिली आहे. पोलिसांच्या तपासात सहकार्य करू.’


हेही वाचा – मी स्वतः कोर्टाच्या निर्णयाचा आदर ठेवून शरण जातोय, नितेश राणेंचे वक्तव्य

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -