घरट्रेंडिंगVideo : जिद्दीला सलाम ! 15 हजार फूट उंच, शून्य डिग्री...

Video : जिद्दीला सलाम ! 15 हजार फूट उंच, शून्य डिग्री तापमानात ITBP  जवानांची कौतुकास्पद लढत

Subscribe

व्हिडीओमध्ये आयटीबीपी जवान १५,००० फुट उंचावरून पहारा देत आहेत. हे जवान दोरी घेऊन एकमेकांच्या सहाय्याने पुढे जाताना दिसत आहेत. त्यांच्या खांद्यावर हत्यारे आणि हातामध्ये काठी आहे. शू्न्य तापमानात जवानांना बर्फातून चालताना अनेक संकटांचा सामना करावा लागतं आहे.

Indo-Tibetan Border Police: भारतीय जवान नेहमीच आपल्या जीवाची बाजी लावून देशाचं रक्षण करत असतात. ऊन-वारा, दिवस-रात्र अशा कुठल्याही परीस्थितीत ते तत्परतेने लढत असतात. असाच एक भारत-तिबेट सीमेवरील सीमा पोलीस (ITBP) जवानांचा व्हिडीओ सोशल मिडियावर वायरल होत आहे. शून्य अंशापेक्षा कमी  तापमानामध्ये सुद्धा आयटीबीपीचे जवान  लढत आहेत. व्हिडीओमध्ये आयटीबीपी जवान १५,००० फुट उंचावरून पहारा देत आहेत. हे जवान दोरी घेऊन एकमेकांच्या सहाय्याने पुढे जाताना दिसत आहेत. त्यांच्या खांद्यावर हत्यारे आणि हातामध्ये काठी आहे. शू्न्य तापमानात जवानांना बर्फातून चालताना अनेक संकटांचा सामना करावा लागतं आहे. परंतु न थांबता ते आपली वाटचाल सुरू ठेवत आहेत. त्याच्या या जिद्दीला सलाम करावासा वाटतो. हा विडियो अनेकांनी सोशल मिडियावर शेयर करून जवानांचे कौतूक केले आहे.

भारत-तिबेट सीमा पोलीस म्हणजेच आयटीबीपीची स्थापना २४ ऑक्टोबर १९६२ रोजी झाली. आयटीबीपी हे लडाख मधील काराकोरम पासून ते अरूणाचल प्रदेश मधील जाचेप पर्यंत ३,४८८ किमी लांब भारत-चीनच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. इतकेच नाही तर या सेनेने १९६५ मध्ये भारत-पाकच्या संघर्षातही सहभाग घेतला होता. पाकच्या घुसखोरांना आणि सैनिकांना संपवण्यासाठी आयटीबीपीचा मोलाता वाटा होता. आयटीबीपी आयबीला संरक्षण प्रदान करते, आयबीला सोबत घेवून सीमेपलीकडून होणार्या गुप्त सूचनांची माहिती घेते.

- Advertisement -

आयटीबीपी हे राष्ट्राचं एक विशेष सशस्त्र पोलीस दल आहे, जे आपल्या जवांनाना गिर्यारोहणाचे आणि अन्य प्रशिक्षण देतात. याबरोबरच अनेक कठीण संकटांना सामोरं जाणे, अचानक उद्धभलेल्या कठीण परीस्थितीवर मात करणे अशी कामगीरी ते बजावत असतात.

- Advertisement -

वर्ष भर  हिमालयाच्या कुशीत राहून तत्परतेने देशाची सेवा करून आपलं मूळ कर्तव्य बजावत असतात. हे कर्तव्य बजावत असताना अनेकदा जवानांना आपले प्राण सुद्धा गमवावे लागतात.


हेही वाचा –  Video: रोजंदारीवर काम करणाऱ्या ६० वर्षीय मजुराचा इन्स्टाग्रामवर धुमाकूळ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -