घरताज्या घडामोडी12th Question Paper Burned : बारावीच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणारा टेम्पो आगीत खाक,...

12th Question Paper Burned : बारावीच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणारा टेम्पो आगीत खाक, अचानक घेतला पेट

Subscribe

संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात बारावीच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणारा टेम्पो आग लागून खाक झाल्याची घटना बुधवारी (दि.२३) सकाळी घडली आहे. याबाबत डोळासणे महामार्ग मदत केंद्राच्या पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, नाशिकहून बारावीच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणारा आयशर टेम्पो (क्र.एमपी ३६ एचओ ७९५) हा पुण्याच्या दिशेने जात होता.

सकाळी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात आला असता त्याचवेळी टेम्पोने अचानक पेट घेतला. त्यानंतर या घटनेची माहिती डोळासणे महामार्ग पोलीस व घारगाव पोलिसांना मिळाली असता पोलीस निरीक्षक सुनील पाटील व महामार्गाचे उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांच्यासह कर्मचार्‍यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ संगमनेर नगरपालिका व कारखान्याच्या अग्निशमन बंबास पाचारण करण्यात आले.

- Advertisement -

शर्थीच्या प्रयत्नांनंतर अखेर ही आग विझविण्यात यश आले. या घटनेत चालक मनीष चौरसिया व व्यवस्थापक रामविलास राजपूत हे दोघेही बालंबाल बचावले. या घटनेनंतर वाहतूक जुन्या चंदनापुरी घाटातून वळविण्यात आली होती. या घटनेची माहिती पुणे येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक महामंडळाच्या अधिकार्‍यांना समजताच त्यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, या प्रश्नपत्रिका भोपाळ येथून नाशिकमार्गे पुण्याला नेत असल्याचे अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.


हेही वाचा : Nawab Malik ED custody : नवाब मलिकांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी, सत्र न्यायालयाचा आदेश

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -