घरमुंबईकोविडच्या नावावर मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार- देवेंद्र फडणवीस

कोविडच्या नावावर मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार- देवेंद्र फडणवीस

Subscribe

आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात त्यांना एक डायरी मिळाली असून, यातून त्यांचे अनेक व्यवहार उघडकीस आले आहेत. याप्रकरणी आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ''कोविडच्या नावाखाली मुंबईत भ्रष्टाचार सुरू होता'', अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे.

शिवसेना उपनेते आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष राहिलेले यशवंत जाधव यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात त्यांना एक डायरी मिळाली असून, यातून त्यांचे अनेक व्यवहार उघडकीस आले आहेत. याप्रकरणी आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ”कोविडच्या नावाखाली मुंबईत भ्रष्टाचार सुरू होता”, अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे.

”आम्ही या आधी देखील हेच सांगत होतो. २४ महिन्यात ३८ प्रॉपर्टी म्हणजे ‘कोविडच्या काळामध्ये आम्ही जे म्हणत होतो, कोविडच्या नावावर भ्रष्टाचार चालला आहे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच होत नव्हतं’. हे आता स्पष्ट झालेलं आहे. तसंच, यासंदर्भात आयकर विभाग योग्य ती चौकशी करेल”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

- Advertisement -

टाइम्स ऑफ इंडिया या वृत्त वाहिनीनं दिलेल्या वृत्तानुसार, या डायरीत निवासी इमारतीतील भाडेकरू हक्क संपादन करण्यासाठी सुमारे १० कोटी रोख दिले. गुढीपाडव्याला ‘मातोश्री’ला २ कोटींचे पेमेंट केले. ‘मातोश्री’ला ५० लाखांचे घड्याळ पाठवले, अशा नोंदी आहेत. याबाबत आयकर विभागाने जाधवांकडे चौकशी केली. मात्र, त्यांनी चलाखीने या विषयाला बगल देत डायरीतील ‘मातोश्री’ हा उल्लेख म्हणजे आपली आई असल्याचे म्हटले आहे.

मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या घराचे नावही मातोश्री आहे. यामुळे असा काही व्यवहार झाला आहे का, याचा तपास आता केला जात आहे. मात्र, यशवंत जाधव यांनी सदर दावे फेटाळले असून, आपल्या आईला या महागड्या वस्तू भेट म्हणून दिल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

आईच्या वाढदिवसाला घड्याळ भेट दिले होते, तर गुढीपाडव्याला आईच्या नावाने २ कोटी रुपयांच्या भेटवस्तू वाटल्या होत्या, असा दावा यशवंत जाधव यांनी केला आहे. या संशयास्पद नोंदींशिवाय न्यूजहॉक मल्टिमिडिया कंपनीशी अनेकविध प्रकारचे संशयास्पद व्यवहार झाल्याचेही आढळून आले आहे. या कंपनीच्या मालकाचे नाव विमल अग्रवाल आहे. याचाही तपास केला जात आहे.


हेही वाचा – खडसेंचा त्रास बास झाला, आता ठाकरे-पवारांनाच सांगतो; शिवसेना आमदाराचा संताप

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -