घरताज्या घडामोडी‘त्रिशला नंदन वीर की, जय बोलो महावीर की’

‘त्रिशला नंदन वीर की, जय बोलो महावीर की’

Subscribe

महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त शहरातून मिरवणूक

‘त्रिशला नंदन वीर की, जय बोलो महावीर की’ चा जयघोष करत भक्तीमय वातावरणात महावीर जयंतीनिमित्त नाशिक शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. महावीर जयंतीनिमित्त शहरासह नाशिकरोड, नवीन नाशिक उपनगरात देखील विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

विश्वाला अहिंसेचा संदेश देणार्‍या भगवान श्री महावीरांचा जन्मकल्याणक महोत्सव गुरूवारी शहराच्या विविध भागात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने जैन सेवा समितीच्यावतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत जैन बांधव राजस्थानी पेहराव, पगडी, पांढरे कपडे परिधान करून सहभागी झाले होते. मिरवणूकीत सहभागी आदिवासी बांधवांचे आदिवासी नृत्य विशेष आकर्षण ठरले. मिरवणूकीत सहभागी कलशधारी महिला…लेझिम वादन अन ‘जय महावीर, त्रिशला नंदन वीर की जय बोलो महावीर की’ अशा जयघोष अशा भक्तीमय वातावरणात मिरवणूक काढण्यात आली. महावीर जयंतीच्या निमित्ताने शहरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात मोठ्या संख्येने सकल जैन समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

- Advertisement -

अहिंसा परमोधर्म की जय, जैन धर्म की जय, जोर से बोलो जय महावीरच्या जयघोषणेने अवघे शहर दुमदुमले. मिरवणुकीत चित्ररथ, हातात फलक घेतलेले जैन श्रावक सहभागी झाले होते.शहरातून जाणार्‍या या मिरवणुकीचे ठिकठिकाणी मोठ्य उत्साहात स्वागत करण्यात आले. रविवार कारंजा जैन स्थानक, होळकर पूल, मालेगाव स्टँड, मखमलाबाद नाका मार्गे धनदाई लॉन्स येथे मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. मिरवणुकीत जैन धर्मगुरू राष्ट्रसंत आचार्य पुलकसागरजी म.सा., श्वेतांबर आचार्य दर्शनवल्लभश्रीसुरीश्वरजी म.सा., साध्वी विभाजी म.सा., आभाजी म.सा. हे देखील उपस्थित होते. कोरोना निर्बंधानंतर तब्बल दोन वर्षांनंतर काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत मोठ्या संख्येने जैन बांधव सहभागी झाले होते.

भगवान महावीरांच्या विचारांचे अनुकरण करा : आयार्य पूलकसागरजी

- Advertisement -

भगवान महावीर यांनी अखंड साधना करून समस्त मानवजाती व प्राणीमात्रांच्या कल्याणाचा संदेश दिला. अडीच हजार वर्षानंतही २४ वे तीर्थंकर असलेल्या महावीरांचा हाच संदेश जगासाठी उपयुक्त ठरत आहे. आंनदायी व समाधानी जीवन जगण्यासाठी प्रत्येकांच्या आचार, विचारात व व्यवहार महावीर असले पाहिजे असे सांगत महावीर को मानो, महावीर की बातों को भी मानो असे प्रतिपादन यावेळी आचार्य पुलकसागरजी यांनी केले. जीवनात काही तरी चांगले कर्म केले पाहिजे. भगवान महावीरांसारखे जीवन जगण्याच्या प्रत्येकांने प्रयत्न करावा. प्रत्येकाने देश सुंदर ठेवण्यासाठी प्रत्येकाने कार्य करा असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

ज्ञानगंगा महोत्सवाचा समारोप

गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या ज्ञानगंगा महोत्सवाचे यावेळी समारोप करण्यात आला. यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री खासदार भारती पवार, महोत्सवाचे स्वागताध्यक्ष अ‍ॅड. राहुल कासलीवाल, आरएमडी ग्रुपच्या शोभा धाडीवाल, श्रध्दा लॉन्सचे सुरेश पाटील उपस्थित होते. महोत्सवाचे दीपप्रज्वलन जैन सेवा संघाचे अध्यक्ष महेश शहा यांनी केले तर फोटोचे अनावरण जैन सेवा संघाच्या पदाधिकारयांनी केले. पादप्रक्षालन मुकेश, मयूर जैन जबलपूरवाले यांनी केले तर गुरुपूजन विजयकुमार, अंतिम कुमार, साहिल व शुभम लोहाडे यांनी केले. शास्त्रभेट अशोक, आनंद, शांता,सेजल पाटणी यांनी केले. भंडारदाता वर्धमान ज्वेलर्सचे आनंदी साखला यांनी केले. तर गुरु आहार डॉ. अनिल, विशाल कासलीवाल यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -