घरट्रेंडिंग'या' चित्रात 16 प्राणी लपलेत, अनेकांना 5 दिसले, तुम्ही शोधून दाखवाच...

‘या’ चित्रात 16 प्राणी लपलेत, अनेकांना 5 दिसले, तुम्ही शोधून दाखवाच…

Subscribe

आता आम्हाला एक असा फोटो सापडलाय, तो पाहून तुम्हीसुद्धा बुचकळ्यात पडाल. कारण पहिल्या नजरेत तुम्हाला या चित्रात फक्त हत्ती आणि गाढवच दिसतील! पण फोटो जवळून पाहिल्यावर त्यात 16 प्राणी पाहायला मिळतात. पण पहिल्यांदा हळूहळू 5 ते 7 प्राणी दिसतील. जर तुम्हाला चित्रात लपलेले सर्व प्राणी सापडले तर तुम्ही स्वतःच्या कौतुकानं थोपटा!

नवी दिल्लीः सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम आहे. त्यावर एखादी गोष्ट क्षणार्धात व्हायरल होते, बऱ्याचदा अनेक व्हायरल फोटो आणि व्हिडीओ पाहून आपण हरकून जातो, तर काही फोटो आणि व्हिडीओ हे हृदयस्पर्शी असतात. विशेष म्हणजे सोशल मीडियावर ‘ऑप्टिकल इल्युजन’ चित्रेसुद्धा मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होतात. ज्या कोणी व्हायरल केल्यात हेसुद्धा समजत नाही. आता आम्हाला एक असा फोटो सापडलाय, तो पाहून तुम्हीसुद्धा बुचकळ्यात पडाल. कारण पहिल्या नजरेत तुम्हाला या चित्रात फक्त हत्ती आणि गाढवच दिसतील! पण फोटो जवळून पाहिल्यावर त्यात 16 प्राणी पाहायला मिळतात. पण पहिल्यांदा हळूहळू 5 ते 7 प्राणी दिसतील. जर तुम्हाला चित्रात लपलेले सर्व प्राणी सापडले तर तुम्ही स्वतःच्या कौतुकानं थोपटा!

फक्त हत्ती, गाढव आणि कुत्रा दिसला?

जर फोटोमध्ये तुम्हाला फक्त हत्ती आणि गाढव दिसला, तर तुम्ही ‘हत्ती’च्या शरीराचे प्रत्येक भाग काळजीपूर्वक पाहा आणि त्याचं निरीक्षण करा. तरच तुम्हाला कुत्रा, कासव, साप, मासे, मगर असे प्राणी दिसायला लागतील. एका युजरने दावा केला आहे की, या ऑप्टिकल इल्युजनमध्ये एकूण 16 प्राणी लपलेले आहेत. त्याने एक आकृती बनवली आणि सर्व प्राण्यांना दाखवून त्यांची नावे सांगितली. पण यात 16 प्राणी नसून 13 प्राणी असल्याचाही दावाही काही युजर्सने केला आहे. ते काहीही असलं तरी तुम्हीसुद्धा नेमके या फोटोत किती प्राणी आहेत हे शोधू शकता. तसेच तुम्हाला सगळे प्राणी दिसल्यास आम्हालाही कमेंट बॉक्समध्ये सांगा.

- Advertisement -

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -