घरअर्थजगतदेशाचं अल्पसंख्याक विरोधी चित्र निर्माण झाल्यास भारतीय कंपन्यांना नुकसान, रघुराम राजन यांचा...

देशाचं अल्पसंख्याक विरोधी चित्र निर्माण झाल्यास भारतीय कंपन्यांना नुकसान, रघुराम राजन यांचा इशारा

Subscribe

दिल्लीच्या जहांगीरपुरी भागात झालेल्या जातीय हिंसाचाराच्या एका दिवसानंतर बुलडोझरने अतिक्रमणविरोधी मोहिमेचा एक भाग म्हणून मशिदीजवळील अनेक तात्पुरत्या स्वरूपातील बांधकामे उद्ध्वस्त केल्याच्या एका दिवसानंतर आरबीआयच्या माजी गव्हर्नरची टिप्पणी आली.

नवी दिल्लीः भारतात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सांप्रदायिक हिंसेच्या दरम्यान रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मोदी सरकारला इशारा दिला आहे. जगभरात भारताचं अल्पसंख्याक विरोधी चित्र निर्माण झाल्यास भारतीय उत्पादक कंपन्यांना मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.

भारताचं अल्पसंख्याक विरोधी चित्र निर्माण झाल्यास परदेशी सरकारे देशावर विश्वास ठेवण्यास शंका उपस्थित करतील. तसेच परदेशी गुंतवणूकदार तुम्हाला एक विश्वासपात्र भागीदाराच्या स्वरूपात पाहणार नाहीत. दिल्लीच्या जहांगीरपुरी भागात झालेल्या जातीय हिंसाचाराच्या एका दिवसानंतर बुलडोझरने अतिक्रमणविरोधी मोहिमेचा एक भाग म्हणून मशिदीजवळील अनेक तात्पुरत्या स्वरूपातील बांधकामे उद्ध्वस्त केल्याच्या एका दिवसानंतर आरबीआयच्या माजी गव्हर्नरची टिप्पणी आली.

- Advertisement -

लोकशाही नेहमीच सोपी नसते

टाइम्स नेटवर्कशी बोलताना माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले की, लोकशाही नेहमीच सोपी नसते, त्यासाठी दिशानिर्देश आवश्यक असतात. लोकशाहीत वेळोवेळी सर्व पक्षांशी चर्चा करावी लागते आणि गरज पडल्यास परिवर्तनाची कास धरावी लागते, असे ते म्हणाले. रशिया आणि चीनचे उदाहरण देताना ते म्हणाले की, या देशांमध्ये चेक अँड बॅलन्स नसल्यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. अल्पसंख्याकांच्या मुद्द्यावर रघुराम राजन म्हणाले, ‘अल्पसंख्याकांसोबत होणाऱ्या गैरवर्तनामुळे जगभरात वाईट चित्र निर्माण झाले आहे, गुंतवणूकदार तुम्हाला विश्वासार्ह भागीदार म्हणून पाहू शकत नाहीत.’


हेही वाचाः Bank Locker Rules : बँक लॉकरच्या नियमात बदल, आता चोरी झाल्यास मिळणार नुकसानभरपाई, जाणून घ्या नियम

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -