घरमहाराष्ट्रगल्ल्यागल्ल्यांसारख्या मारामाऱ्या राज्यात सुरू, चंद्रकांत पाटलांचा घणाघात

गल्ल्यागल्ल्यांसारख्या मारामाऱ्या राज्यात सुरू, चंद्रकांत पाटलांचा घणाघात

Subscribe

बिहार करायचं काय, बंगाल करायचं काय, आता अन्य राज्य असं म्हणणार महाराष्ट्र करायचं काय, असं म्हटल्यावर महाराष्ट्राची बदनामी होते. पण बदनामी कोणामुळे होते, सरकार तुमचं आहे. बदनामी होऊ नये यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता. अक्षरशः हाताची घडी घालून तुम्ही बसलेले आहात आणि सगळं केंद्राकडे ढकलून मोकळे होता.

मुंबईः भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. गल्ल्यागल्ल्यांमध्ये जशा मारामाऱ्या होतायत. अशा प्रकारच्या मारामाऱ्या राज्यात जोरजोरात सुरू असल्याचं सांगत चंद्रकांत पाटलांनी हल्लाबोल केला आहे. चंद्रकांत पाटील माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय. त्यावेळी ते बोलत होते.

बिहार करायचं काय, बंगाल करायचं काय, आता अन्य राज्य असं म्हणणार महाराष्ट्र करायचं काय, असं म्हटल्यावर महाराष्ट्राची बदनामी होते. पण बदनामी कोणामुळे होते, सरकार तुमचं आहे. बदनामी होऊ नये यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता. अक्षरशः हाताची घडी घालून तुम्ही बसलेले आहात आणि सगळं केंद्राकडे ढकलून मोकळे होता. त्यामुळे महाराष्ट्राची ही बदनामी थांबवणं हे ज्यांचं राज्य आहे, त्यांच्याच हातात आहे. मुख्यमंत्र्यांनी भोंगेविषयी बैठक लावायची आणि स्वतः उपस्थित राहायचे नाही. मग राज ठाकरे उपस्थित राहतील, असं होत नसतं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असल्यानं आपण उठून त्या ठिकाणी जायचं असतं. देवेंद्रजी उठून जायचे, कोणाच्या तरी घरी जायचे, भेटायचे, बोलायचे, त्यामुळे मला असं वाटतं, असंही चंद्रकांत पाटील म्हणालेत.

- Advertisement -

मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे शिवसेनेत प्रवेश करणार असण्याच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटलांनी भाष्य केलंय. सरकारी नोकरीतून बाहेर पडल्यानंतर आलेला फटीक, थकवा, कंटाळा, चिडचिड संपवून एखादी सामाजिक काम करण्याची इच्छा व्यक्त करणारा असेल तर ती चांगली गोष्ट असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं आहे.

मी कधीच चौकटीच्या बाहेर बोलत नाही. सीआयएसएफचे पोलीस कुठे होते हे सीआयएसएफच्या एजन्सीनं शोधावं. सीआयएसएफचे जवान उपस्थित असताना, झेड सिक्युरिटी असताना महाराष्ट्र पोलिसांच्या उपस्थितीत शिवसैनिक किंवा समाजकंटकांनी दगड कसा फेकला, त्यावेळी कोणालाच कसं पकडलं नाही, असे सगळेच प्रश्न आहेत. पण याची व्यवस्थित दखल केंद्राच्या गृहखात्याने घेतली आहे. नवनीत राणा विषयात लोकसभेच्या अध्यक्षांनी दखल घेतली आहे. केंद्राची सिक्युरिटी असतानाही सोमय्यांवर हल्ला होतो कसा, महाराष्ट्र पोलीस बघ्याची भूमिका घेत होते का याची दखल केंद्रीय गृहखात्याने घेतली आहे. जखम किरकोळ की जखम मोठी यावर कलम ठरत नाही. एखाद्याने रायफलने हल्ला केला आणि अतिशय छोटी जखम झाली, असं होऊ शकतं. मग तो रायफलने केलेला हल्ला हा गुन्हा होऊ शकत नाही का?, जीवे मारण्याचा प्रयत्न याला 307 कलम लागतं आणि जीवे मारण्याचा प्रयत्न म्हणून यावर 307 कलम लागलंच पाहिजे. अनेक वेळेला जखम होणार पण नाही. त्या माणसाचं दैव बलवत्तर की त्याला काहीच झालं नाही. त्याच्यावर हल्ला झाला ही फॅक्ट आहे, असंही ते म्हणालेत.

- Advertisement -

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआयद्वारे चौकशी सुरू आहे. सीबीआयप्रमाणे ईडीच्या द्वारे चौकशी सुरू आहे. सीबीआय आणि ईडी आवश्यकतेनुसार चांदिवाल आयोगाची दखल घेईल. पण माझं वारंवार एकच म्हणणं असतं आपण अॅथॉरेटी नाही. सीबीआय, ईडी यांनी काय करावं, चांदिवाल आयोगानं काय करावं, चांदिवाल आयोगानं राज्याच्या गृहमंत्रालयावर ताशेरे ओढले असतील तर त्याची दखल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घ्यावी. आम्ही ती अॅथॉरिटी नसल्याचंही त्यांनी सांगितले.


हेही वाचाः सोमय्यांच्या किरकोळ जखमेतून रक्तस्त्राव नाही, वैद्यकीय अहवालात खळबळजनक खुलासा

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -