घरमहाराष्ट्रLoad Shedding : ऐन उन्हाळ्यात डोंबिवलीकरांना लोडशेडिंगचा शॉक; 6 तास वीजपुरवठा बंद

Load Shedding : ऐन उन्हाळ्यात डोंबिवलीकरांना लोडशेडिंगचा शॉक; 6 तास वीजपुरवठा बंद

Subscribe

electricity load shedding | विजेची वाढती मागणी आणि त्याच कोळसा टंचाईमुळे राज्यातील अनेक ठिकाणी भार नियमनाचा फटका सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे कल्याण डोंबिवली परिसरात काही दिवसांपूर्वी तांत्रिक बिघाडामुळे नागरिकांना भार नियमनाचा त्रास सहन करावा लागला. अचानक परिसरातून वीज गायब झाल्याने नागरिक गरमीने हैराण झाले. ऐन उन्हाळ्यात विजेचे लोडशेडिंग झाल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. तर आज सकाळपासूनच डोंबिवली परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. दरम्यान शुक्रवारी सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद झाला आहे. यामुळे पहाटेपासूनच डोंबिवलीकरांना त्रास सहन करावा लागतोय.

डोंबिवलीतील 12 फिडरचा वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे डोंबिवली पूर्वेतील सावरकर रोड, तुकारामनगर, पी ॲन्ड टी कॉलनी, नांदिवली, पांडुरंगवाडी, आगरकर रस्ता,टिळकनगर,चार रस्ता आणि डोंबिवली पश्चिमेतील नवापाडा, गरीबाचापाडा, जय हिंद कॉलनी, गुप्ते रस्ता, शास्त्रीनगर संचयकांवरून पुरवठा बंद असणार आहे.

- Advertisement -

तसेच तुकारामनगर भागातील नवचेतन संकुल, लक्ष्मण रेषा, आयरे रस्ता, सुदाम वाडी, पाटकर शाळा, नांदिवली भागातील टिळकनगर, चार रस्ता, सावरकर नगर, टिळक रस्ता, नांदिवली मठ, सुनील नगर, नांदिवली रस्ता, पांडुरंगवाडी भागातील संगीतावाडी, श्रीखंडेवाडी, एकता नगर, डीएनसी शाळा, गोपाळबाग, आगरकर रस्ता भागातील आगरकर रस्ता, रेल्वे स्थानक रस्ता, नेहरू मैदान, सर्वेश सभागृह, ताई पिंगळे चौक, ब्राम्हण सभा, पी ॲन्ड टी भागातील स्वामी समर्थ मठ, हनुमान मंदिर या भागात वीज पुरवठा बंद असणार आहे.

याशिवाय डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगर परिसरातील कोपर गाव, चिंचोलीपाडा, डॉन बॉस्को शाळा, गुप्ते रस्ता भागातील जाधववाडी, रेल्वे स्थानक भाग, रमेशनगर, महात्मा फुले रस्ता कोपर रस्ता, कुंभारखाणपाडा, राजू नगर, गणेशघाट, ठाकुर्ली, शंकेश्वर पाम, वृंदावन कॉलनी, गंगेश्वर कृपा, गरीबाचापाडा भागातील जलकुंभ, महाराष्ट्रनगर, श्रीधर म्हात्रे चौक, सरोवरनगर, जयहिंद कॉलनी भागातील जोशीवाडी, मॉडेल शाळा, गोपी मॉल, रोकडे इमारत, वेलंकणी शाळा,  शास्त्रीनगर, जुनी डोंबिवली, ठाकुरवाडी, समर्थ चौक, पी. डी. रस्ता, फुले नगर, महात्मा गांधी रस्ता, अण्णा नगर, सिध्दार्थनगर. नवापाडा भागातील गणेशनगर, आननंदनगर भागातील वीज पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती वीज वितरण महामंडळाने दिली आहे.


दोन लसींना ९ महिने पूर्ण होण्याआधीच घेता येणार लसीचा बुस्टर डोस; NTAGI ची शिफारस

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -