घरताज्या घडामोडीअयोध्या आणि मथुरेत दारु विक्रीवर बंदी, योगी सरकारचा मोठा निर्णय

अयोध्या आणि मथुरेत दारु विक्रीवर बंदी, योगी सरकारचा मोठा निर्णय

Subscribe

अयोध्येतील दारुची दुकाने आता बंद करण्यात आली असून १ जूनपासून या दुकानांना टाळे लावण्यात येणार आहे.

उत्तर प्रदेशच्या मुथरा आणि उत्तर प्रदेशमध्ये आता मद्यपींना दारु पिण्यासाठी (Liquor) मिळणार नाही. उत्तर प्रदेशच्या सरकारने या ठिकाणी दारु बंदीचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath )यांच्या सरकारने मोठा निर्णय़ घेतला आहे. मथुरेत श्री कृष्ण जन्मस्थानाजवळच्या परिसरामध्ये आणि अयोध्यामध्ये श्री राम मंदिराच्या ( Ram Janmabhoomi) परिसरात दारु विक्रीवर बंदी घातली आहे. तसेच या परिसरात असलेल्या दुकानांचे परवाने रद्द केले आहेत. १ जूनपासून दारु विक्री, बीयरचे दुकान आणि भांग विकण्यावर बंदी असणार आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी श्री राम मंदिराच्या गर्भगृहाचे शिलान्यास करुन शुभारंभ केला. यावेळी अनेक साधू संत उपस्थित होते. या गर्भगृहाचे काम युद्ध पातळीवर करण्यात येणार आहे. दरम्यान आयोध्या राम मंदिराच्या बाजूला जे दारुची दुकाने आहेत. त्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. तसेच १ जूनपासून दारु विक्री करण्यावर बंदी असणार असल्याचा निर्णय़ योगी सरकारने घेतला आहे.

- Advertisement -

आजपासून श्री राम मंदिराच्या गर्भ गृहाचे कामकाज सुरु करण्यात आले आहे. दगडी बांधकामासह आजपासून मंदिराच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. योगी आदित्यनाथ यांनी शिलान्यास केला. यावेळी उत्पादन शुल्क मंत्री नितीन अग्रवाल अबकारी दुकाने क्रमांक आणि स्थान नियम १९८६ नुसार प्रार्थना स्थळ, शाळा, रुग्णालयापासून १०० मीटरच्या अंतरावर उप दुकानाला परवाना दिला जात नाही. अयोध्येतील दारुची दुकाने आता बंद करण्यात आली असून १ जूनपासून या दुकानांना टाळे लावण्यात येणार आहे.

उत्तर प्रदेशच्या विधान परिषदेमध्ये एका प्रश्नाचे उत्तर देताना उत्पादन शुल्क मंत्री नितीन अग्रवाल यांनी सांगितले की, अयोध्येतील श्री राम मंदिराच्या परिसरात येणाऱ्या सर्व मद्याच्या दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. निकषांचे उल्लंघन केल्याबद्दल आक्षेप असल्यास, चौकशी केली जाईल. ते म्हणाले की, अयोध्येतील मंदिर परिसराभोवती असलेली दारूची दुकाने सरकारने हटवली आहेत अशी माहिती विधान परिषदेच्या सभागृहात देण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Sidhu Moose Wala Murder : सिद्धू मूसेवालाच्या हत्येचा बदला लवकरच घेऊ; दिल्लीच्या ‘या’ गँगने दिले ओपन चॅलेंज

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -