घरताज्या घडामोडीकाँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी कोरोना पॉझिटिव्ह; संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचे आवाहन

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी कोरोना पॉझिटिव्ह; संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचे आवाहन

Subscribe

कॉंग्रेस (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. सोनिया गांधी यांनी बुधवारी संध्याकाळी सौम्य ताप आला होता.

कॉंग्रेस (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. सोनिया गांधी यांनी बुधवारी संध्याकाळी सौम्य ताप आला होता. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सोनिया गांधी यांची कोरोनाची चाचणी (Corona Test) करण्यात आली होती. दरम्यान, सोनिया गांधी यांना कोरोनाची (Sonia Gandhi Corona Positive) लागण झाल्याची माहिती गुजरातचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जगदीश ठाकूर (Gujarat Congress State President Jagdish Thakur) यांनी ट्वीटरच्या माध्यमातून दिली आहे.

काही दिवसांपूर्वी सोनिया गांधा यांनी काँग्रेस चिंतन शिबिरात हजेरी लावली होती. यावेळी कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह अनेक नेते मंडळी उपस्थित होतो. या शिबिरात उपस्थित असणाऱ्या इतर कार्यकर्त्यांना व नेत्यांना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींना ईडीचे समन्स, ८ जूनला चौकशीला हजर राहण्याचे आदेश

दरम्यान, मुंबईसह (Mumbai) देशभरात मागील काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढलं आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारनेही नागरिकांना काळजी घेण्याचे आव्हान केले आहे. तसेच सतर्क राहण्याचे सांगितले आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काळजी व्यक्त केली. राज्यात वाढ असलेल्या कोरोना रुग्णांमुळे (Corona Patients) कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आव्हान त्यांनी केले आहे. शिवाय मास्कचा नियमीत वापर करण्याचेही त्यांनी सांगितले आहे.


हेही वाचा – धोका वाढला! महाराष्ट्रात 1081 नवे कोरोना रुग्ण; मुंबईत चार महिन्यांचा रेकॉर्ड मोडला, आरोग्य यंत्रणा सतर्क

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -