घरताज्या घडामोडीअरब देशातील कचराकुंड्यांवर मोदींचा फोटो, काँग्रेस नेत्यांनी केला निषेध

अरब देशातील कचराकुंड्यांवर मोदींचा फोटो, काँग्रेस नेत्यांनी केला निषेध

Subscribe

काँग्रेस नेते नाना पटोले आणि सुरेंद्र राजपूत यांनी निषेध व्यक्त केला आहे.

भाजप नेत्यांनी मोहम्मद पैगंबर (Mohammad Paigambar) यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे अरब देशाने (Arab Country) भारताचा निषेध केला आहे. एवढंच नव्हे तर अरब देशातील कचराकुंड्यांवर (Dustbin) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा फोटो चिटकवून त्यावर बुटाचे काळे ठसे उमटवण्यात आले आहेत. अरब देशांनी केलेल्या या कृत्याचा भारतीयांनी कडाडून विरोध केला आहे. तसेच, काँग्रेस नेते नाना पटोले (Congress Leader Nana Patole) यांनीही या कृत्याचा निषेध केला आहे.

मोदीजी आमचे विरोधक असले तरीही कचराकुंड्यावर अशाप्रकारे फोटो चिटकवणे संतापजनक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – भाजपला सर्वधर्मांचा आदर, प्रवक्ता नुपूर शर्माच्या वादग्रस्त वक्तव्यावर पार्टीची स्पष्टोक्ती

ट्विट करत नाना पटोले म्हणाले की, ‘अरब देशातील कचराकुंड्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावल्याचे कृत्य अतिशय संतापजनक आहे. या कृत्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो. मोदीजी आमचे विरोधक असले आणि त्यांची विचारसरणी आम्हाला पटत नसली तरी लोकशाही पद्धतीने आम्ही त्यांचा विरोध करू’, असं ते म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा Nupur Sharma : टीव्ही वाहिनीवरील आक्षेपार्ह वक्तव्यानंतर भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मांविरोधात मुंबई एफआयआर दाखल

ते पुढे म्हणाले की, विचारांची लढाई विचारांनीच लढायला हवी. मोदीजी भारताचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची अशाप्रकारे होत असलेली बदनामी आम्ही मुळीच सहन करणार नाही.


दरम्यान, काँग्रेस नेते सुरेंद्र राजपूत (Congress Leader Surendra Rajput) यांनीही याचा कडाडून विरोध केला आहे. मोदीजींना आमचा विरोध देशात आहे आणि आम्ही लोकशाही मार्गाने मोदींचा पराभव करू. पण एका अरब देशाच्या डस्टबिनवर आपल्या देशाच्या पंतप्रधानांचा फोटो लावणे पूर्णपणे चुकीचं आहे. प्रत्येक भारतीयाने याला विरोध केला पाहिजे. परराष्ट्रमंत्र्यांनी आणि परराष्ट्र मंत्रालयाने याची दखल घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.


काय आहे प्रकरण?

भाजप प्रवक्त्या नूपुर शर्मा (Nupur Sharma) आणि नवीन जिंदाल (Navin Jindal) यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांच्या या विधानाचा देशभर तीव्र पडसाद उमटले. कानपूरमध्ये यावरून मोठा राडाही झाला. त्याच काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी कानपूर दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर हे प्रकरण आखाती देशात पसरल्यानंतर कुवेत, कतार आणि इराणमधूनही भारतावर कडक टीका झाली. या देशांनी भारतीय दूतावासाला समन्स बजावून या प्रकरणी विचारणा केली. शर्मा आणि जिंदाल यांची विधाने भारत सरकारची नाहीत, असं स्पष्टीकरण भारतीय दुतावासांनी दिले. दरम्यान, हे प्रकरण वाढल्याने भारतीय जनता पक्षाने दोघांनाही पक्षामधून काढले आहे. या दोन्ही व्यक्ती भारत सरकारमध्ये कोणत्याही अधिकृत पदावर नाहीत, त्यांना पक्षाने निलंबित केले आहे, त्यांच्या विधानांशी सरकारचा कोणताही संबंध नाही, असे तेहरानमधील भारतीय दुतावासाने म्हटलं आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -