घरताज्या घडामोडीकोणीही पावसात भिजलं तरी त्याचा परिणाम होणार नाही, गोपीचंद पडळकरांचा टोला

कोणीही पावसात भिजलं तरी त्याचा परिणाम होणार नाही, गोपीचंद पडळकरांचा टोला

Subscribe

विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडत आहेत. आतापर्यंत २५० हून अधिक आमदारांनी मतदान केलं आहे. तसेच सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांकडून ऐकमेकांवर टीका केली जात आहे. तर मतदानाची प्रक्रिया सुरू असतानाच भाजपच्या बड्या नेत्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. दरम्यान, कोणीही पावसात भिजलं तरी त्याचा परिणाम होणार नाही, असा टोला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.

कोणी कितीही पावसात भिजलं, तरी त्याचा परिणाम होईल असं आज वाटत नाही. भारतीय जनता पक्ष लोकशाहीवर विश्वास ठेवणारा पक्ष आहे. या राज्यामध्ये २०१९ला ज्यापद्धतीने विश्वासघात झाला होता. जनतेने दिलेलं मताचं कौल, त्या कौलाच्या पाठीत खंजीर खुपसून सत्ता स्थापन करण्यात आली होती. परंतु आता आमदारांना पहिल्यांदाच मत व्यक्त करण्यासाठी योग्य संधी आलेली आहे. ज्या लोकांमधून हे आमदार निवडून आले आहेत. त्या लोकांनी १६१ आमदार हे युतीचे निवडून दिले होते. निश्चितपणे हे आमदार मतदानातून व्यक्त होतील, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

- Advertisement -

राज्यातील अपक्ष आमदारांची किती अब्रू घालवली. अपक्ष आमदारही लोकांमधून निवडून आलेले आहेत. यांनी त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. लोकांनी आमदारांना निवडून दिले, त्यांच्या मनात आपल्या आमदाराविषयी मत कलुशीत करण्याचे काम यांनी केले. त्यामुळे हे सगळे आमदार आजच्या दिवशी व्यक्त होतील. असं पडळकर म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची साताऱ्यात भर पावसात सभा झाली होती. अंगावर पावसाच्या सरी कोसळत असतानाही शरद पवारांनी आपलं भाषण न थांबवता सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाला होता.

- Advertisement -

हेही वाचा : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर शस्त्रक्रिया पूर्ण, प्रकृतीबाबत रूग्णालयाच्या वतीने सविस्तर माहिती देण्यात येणार


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -