घरमहाराष्ट्रबंडखोर आमदारांच्या पलायनाची चौकशी होणार?, पोलीस आयुक्त संजय पांडेंना आदेश

बंडखोर आमदारांच्या पलायनाची चौकशी होणार?, पोलीस आयुक्त संजय पांडेंना आदेश

Subscribe

मंत्री, आमदार महाराष्ट्राच्या बाहेर जात असताना त्यांच्या सोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी कोणती माहिती गृहखात्याला दिली होती की नव्हती, याबद्दल चौकशी करण्यात येणार आहे.

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे एकाचवेळी ३० पेक्षा जास्त आमदारांना महाराष्ट्राबाहेर घेऊन जात असताना त्याची कुणकुण गृह खात्याला कशी लागली नाही, याची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

इतक्या मोठ्या संख्येने आमदार बाहेर जात असताना महाराष्ट्र पोलिसांना त्याची साधी खबरही लागत नाही ?, असा सवाल उपस्थित होत आहे. राज्य सरकारमधील गृह राज्यमंत्र्यांसह कॅबिनेट मंत्री, आमदार सुरतमध्ये पोहचले. मंत्री, आमदार महाराष्ट्राच्या बाहेर जात असताना त्यांच्या सोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी कोणती माहिती गृहखात्याला दिली होती की नव्हती, याबद्दल चौकशी करण्यात येणार आहे.

- Advertisement -

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यात दोन बैठका पार पडल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी संजय पांडे यांना चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यातील कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री यांचे सुरक्षारक्षक आता अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विधान परिषदेचे मतदान पार पाडल्यानंतर काही तासात विधान परिषदेच्या सर्व जागांचा निकालही आला. यात महाविकास आघाडीला एका जागेवर फटका बसला. तर भाजपच्या पाच जागा निवडून आल्या. महाविकास आघाडीचे नेते यावर प्रतिक्रिया देत असताना त्याच रात्री एकनाथ शिंदे हे आमदारांचा ताफा घेऊन राज्याच्या बाहेर पडले. यात फक्त आमदारच नाही. तर कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्रीही होते. मग एवढी मोठी घटना घडत असतानापोलीस सुरक्षा रक्षकांनी वरिष्ठांना कल्पना का दिली नाही? आणि गुप्तचर विभागालाही याची खबर कशी लागली नाही?, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आश्चर्य व्यक्त केले होते.

- Advertisement -

हेही वाचाः …तर स्वतःच्या बापाच्या नावानं मतं मागा, उद्धव ठाकरेंचा बंडखोरांवर हल्लाबोल

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -