घरदेश-विदेशजेम्स वेब टेलिस्कोपने टिपली अवकाशातील काही खास दृश्य

जेम्स वेब टेलिस्कोपने टिपली अवकाशातील काही खास दृश्य

Subscribe

या टेलिस्कोपने टिपण्यात आलेले फोटो आकाशगंगांच्या विहंगम दृश्यांची परिपूर्ण आहेत. या संदर्भांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सोमवारी अमेरिकेच्या व्हाईट हाऊस नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांच्या उपस्थितीत जेम्स वेब टेलीस्कोपची पहिली झलक दाखवली.

विश्व प्रसिद्ध असलेली अमेरिकन स्पेस एजन्सी ‘नासा’च्या ‘जेम्स वेब टेलिस्कोप’ने(james webb space telescope) अंतराळातील काही दृश्ये टिपली आहेत. अंतराळातील आत्तापर्यंत टिपण्यात आलेल्या या दृश्यांपैकी ही दृश्ये खूप खास आणि वेगळी आहेत आणि हीच दृश्ये आता संपुर्ण जगासमोर आणली आहेत. या टेलिस्कोपने टिपण्यात आलेले फोटो आकाशगंगांच्या विहंगम दृश्यांची परिपूर्ण आहेत. या संदर्भांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सोमवारी अमेरिकेच्या व्हाईट हाऊस नासाचे(nasa) प्रशासक बिल नेल्सन यांच्या उपस्थितीत जेम्स वेब टेलीस्कोपची पहिली झलक दाखवली.

हे ही वाचा – अबू सालेमचा २५ वर्षांहून अधिक तुरुंगवास होऊ शकत नसल्याचा दावा, सुप्रीम कोर्ट…

- Advertisement -

याच संदर्भांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन(joe biden) यांनी एक ट्विट सुद्धा केले. ”वेब स्पेस टेलिस्कोपने घेण्यात आलेली पहिली दृश्य हे वैज्ञानिक क्षेत्रातील एक ऐतिहासिक क्षणाचे प्रतिनिधित्व करतो. त्याचसोबत खगोल, विज्ञान आणि अंतराळातील संशोधनासाठी आणि त्याचबरोबर अमेरिका आणि संपूर्ण जगासाठी, मानवासाठी मत्त्वपूर्ण आहे.”

- Advertisement -

हे ही वाचा – लोकसभेतही शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर! 19पैकी 14 खासदारांचा स्वतंत्र गट?

सोमवारी काही फोटो जगासमोर आणल्यानंतर त्यातीलच आणखी चार फोटो मंगळवारी समोर आणण्यात येतील. व्हाईट हाऊस मधील एका कार्यक्रमात अंतराळातील अनेक फोटो दाखविण्यात आले. बिल नेल्सन याणी सांगितले, की ‘आम्ही मानवाला ब्रह्मांडाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्ष्टीकोन देत आहोत. आणि ही अंतराळातील असे दृश्य आहेत जी आपण कधीच पहिली नाहीत. या टेलिस्कोपच्या वापराचा हाच प्रयत्न असेल की जेव्हा अंतराळाची निर्मिती झाली तेव्हाची दृश्य सुद्धा टिपू शकता येतील. १३. ७ अरब वर्षांपूर्वी अंतराळात काय हालचाली झाल्या हे पाहण्याच्या या टेलिस्कोपच्या निर्मितीचा प्रयत्न आहे.’ ही निर्मिती विज्ञानाला आणि मानवाला नवी दृष्टी देणारी ठरणार आहे.

हे ही वाचा – ब्रह्मांडाच्या रहस्याबाबत ‘NASA’चे संशोधन

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -