घरताज्या घडामोडीमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शिवसेनेच्या नव्या नियुक्त्या जाहीर, कोणाकडे कोणती पदे?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शिवसेनेच्या नव्या नियुक्त्या जाहीर, कोणाकडे कोणती पदे?

Subscribe

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेच्या नवीन पदांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही नियुक्तीपत्रे आज प्रदान करण्यात आली आहेत. शिवसेना आपलीच असल्याचा दावा शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून केला जातोय. मात्र, ही लढाई आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचली असतानाच एकनाथ शिंदे यांनी मोठी कुरघोडी केली आहे. त्यांनी शिवसेनेच्या नवीन पदांची नियुक्ती जाहीर केली आहे.

कोणाकडे कोणती पदे?

शिवसेनेच्या सचिवपदी कामगार नेते किरण पावसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांची शिंदेंनी सचिव पदावर नियुक्ती केली आहे. आमदार दिपक केसरकर हे पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदी कायम राहणार आहेत. याशिवाय शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील, शिवसेना उपनेते आणि आमदार उदय सामंत, किरण पावसकर, आमदार गुलाबराव पाटील आणि दहिसरच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे.

- Advertisement -

अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची पक्षाच्या खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ही नियुक्तीपत्रे किरण पावसकर आणि संजय मोरे यांना देण्यात आली आहेत. तर उर्वरित नेत्यांना देखील ती लवकरच देण्यात येणार आहेत. या नियुक्त्यांमुळे पक्षाचे काम अधिक जोमाने करता येणे शक्य होणार आहे.

शिंदे सरकार अॅक्शन मोडमध्ये

दरम्यान, शिंदे सरकार स्थापन झाल्यानंंतर अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाहीये. आज एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, काही महत्त्वाच्या कामानिमित्त त्यांनी आपला दिल्ली दौरा रद्द केला. मात्र, दिल्ली दौरा रद्द केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेनेच्या नवीन पदांची नियुक्ती जाहीर केली असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना धक्का दिला आहे. आजच्या नियुक्त्यांनंतर शिंदे सरकार अॅक्शन मोडमध्ये असल्याचं दिसून येत आहे.

- Advertisement -

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणाच्या चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेतील दोन्ही गटांना कागदोपत्री पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. निवडणूक आयोगाने ८ ऑगस्टला दुपारी १ वाजेपर्यंत आपलं म्हणणं मांडण्याची मुदत दोन्ही गटांना दिली आहे. त्यानंतर निवडणूक आयोग या प्रकरणी सुनावणी करणार असल्याचे समजते. त्यामुळे निवडणूक आयोग काय निर्णय घेणार हे पाहणं दोन्ही गटांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा : ‘मुख्यमंत्री वॉर रूम-पायाभूत सुविधा प्रकल्पां’च्या महासंचालकपदी मोपलवारांची नियुक्ती


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -