घरमहाराष्ट्रसंजय राऊतांचा आवाज दाबण्यासाठी भाजपकडून राजकीय खेळी, सुनील राऊतांचा गंभीर आरोप

संजय राऊतांचा आवाज दाबण्यासाठी भाजपकडून राजकीय खेळी, सुनील राऊतांचा गंभीर आरोप

Subscribe

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आधीच याप्रकरणी स्टेटमेंट दिलं आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी याप्रकरणी लोकसभेत मुद्दा उचलून धरला. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत महाविकास आघाडी संजय राऊतांसोबत आहे. उद्धव ठाकरेही त्यांना एकटे पडू देणार नाहीत.

संजय राऊत भाजपविरोधी बोलत होते. त्यांचा आवाज दाबण्यासाठी भाजपने ही राजकीय खेळी केला असल्याचा दावा संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी केला आहे. आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

तसेच, संजय राऊत यांच्या पाठिशी संपूर्ण महाविकास आघाडी आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुखांनी तर आधीपासूनच त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आधीच याप्रकरणी स्टेटमेंट दिलं आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी याप्रकरणी लोकसभेत मुद्दा उचलून धरला. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत महाविकास आघाडी संजय राऊतांसोबत आहे. उद्धव ठाकरेही त्यांना एकटे पडू देणार नाहीत.

- Advertisement -

सुनील राऊत यांनी यावेळी भाजपच्या कार्यपद्धतीवरही टीकास्त्र सोडलं. भावना गवळी यांच्यावरही ईडी चौकशी लावण्यात आली होती. मात्र, त्यांनी शिंदे गटात प्रवेश करताच त्यांच्या दोन माणसांना तत्काळ जामीन मिळाला. त्यांनाही क्लिन चीट देण्यात आली. एवढ्या दिवस भावना गवळी बेपत्ता होत्या. ईडीला घाबरून त्या पुढे येत नव्हत्या. मात्र, संजय राऊत बेधडक शिवसैनिक आहेत. ते बाळासाहेबांचा माणूस असून निष्ठावंत सैनिक आहेत. त्यामुळे, राऊत यातूनही सहीसलामत बाहेर पडतील. ज्या पद्धतीने ते ईडीला सामोरे गेले, अटक करून घेतली यामुळे शिवसैनिकांना आणि उद्धव ठाकरेंना त्यांचा अभिमान आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडता ते ईडीला सामारे गेले. त्यामुळे जे सत्य आहे ते बाहेर येईलच. त्यांनी भाजपविरोधी भूमिका घेतल्यानेच त्यांचा आवाज दाबण्यासाठी भाजपने ही राजकीय खेळी केला असल्याचा आरोप सुनिल राऊत यांनी केला आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -