घरसंपादकीयदिन विशेषइतिहास संशोधक दत्तो वामन पोतदार

इतिहास संशोधक दत्तो वामन पोतदार

Subscribe

दत्तो वामन पोतदार हे थोर इतिहास संशोधक, मराठी लेखक आणि शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अभ्यासक होते. त्यांचा जन्म ५ ऑगस्ट १८९० रोजी कुलाबा जिल्ह्यातील बिरवाडी या गावी झाला. त्यांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात झाले.

दत्तो वामन पोतदार हे थोर इतिहास संशोधक, मराठी लेखक आणि शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अभ्यासक होते. त्यांचा जन्म ५ ऑगस्ट १८९० रोजी कुलाबा जिल्ह्यातील बिरवाडी या गावी झाला. त्यांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात झाले. १९०६ मध्ये ते मॅट्रिक झाले. १९१० मध्ये पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून ते बी.ए. झाले. त्यानंतर त्यांनी न्यू पूना कॉलेजात इतिहास आणि मराठी विषयांचे अध्यापन केले. त्यांनी केलेल्या अव्याहत विद्याव्यासंगामुळे त्यांना केंद्र शासनाने ‘महामहोपाध्याय’ ही पदवी दिली (१९४८). हिंदी साहित्यसंमेलनाने त्यांना ‘साहित्यवाचस्पति’ ही उपाधी प्रदान केली. वाराणसेय विश्वविद्यापीठ व पुणे विद्यापीठ यांनी डी.लिट्. पदवी देऊन त्यांचा सन्मान केला.

प्राचीन मराठी साहित्य आणि मराठ्यांचा इतिहास ह्या विषयांचा त्यांचा विशेष व्यासंग होता. तत्संबंधी भारत इतिहास संशोधक मंडळाच्या नियतकालिकांत आणि अन्यत्रही त्यांनी बरेच स्फुट लेखन केले आहे. मराठी गद्याचा इंग्रजी अवतार (१९२२) हा त्यांचा ग्रंथ अव्वल इंग्रजीच्या कालखंडातील (१८१०- ७४) मराठी साहित्येतिहास लिहिण्याचा प्रारंभीचा प्रयत्न म्हणून उल्लेखनीय आहे. या कालखंडातील मराठी गद्याच्या जडणघडणीचे सप्रमाण दर्शन या ग्रंथात घडविण्यात आले आहे. महाराष्ट्र-साहित्य परिषद-इतिहास, वृत्तविभाग व साधन विभाग (१९४३) या त्यांच्या पुस्तकात मराठी साहित्यिकांचे प्रतिनिधित्व करणार्‍या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आरंभीच्या कालखंडातील कार्याची माहिती आहे.

- Advertisement -

ते एक उत्तम वक्तेही होते. मराठीप्रमाणेच इंग्रजी, हिंदी व संस्कृत या भाषांतही ते प्रभावीपणे भाषणे करू शकत. त्यांनी दिलेली काही व्याख्याने ‘श्रोतेहो’ या नावाच्या पुस्तकात संग्रहीत आहेत. निरनिराळ्या निमित्ताने भारतात, तसेच परदेशातही त्यांनी प्रवास केला होता. त्यांच्या व्यासंगाच्या मानाने त्यांची ग्रंथरचना संख्येने कमी आहे, तथापि त्यांनी केलेल्या लेखनामुळे व संस्थासंचालनामुळे महाराष्ट्राचे सांस्कृतिक जीवन समृद्ध झाले आहे. अशा या थोर इतिहास संशोधकाचे ६ ऑक्टोबर १९७९ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -