घरदेश-विदेश'हर घर तिरंगा' अभियानाचं नवं गाणं; आशा भोसले, सोनू निगम, अमिताभ बच्चन...

‘हर घर तिरंगा’ अभियानाचं नवं गाणं; आशा भोसले, सोनू निगम, अमिताभ बच्चन यांचा स्वरसाज

Subscribe

हे गाणं जेष्ठ गायिका अशा भोसले आणि गायक सोनू निगम,अमिताभ बच्चन यांनी सुरेल आवाजात गायलं आहे. त्यांच्यासोबतच या गाण्यात  अनुष्का शर्मा, विराट कोहली, अक्षय कुमार(akshay kumar ), प्रभास (prabhas), कीर्ती सुरेश आणि नीरज चोप्रा(niraj chopra) हे सेलिब्रिटी झळकणार आहेत.

येत्या १५ ऑगस्टला(15 august) भारताला(india) स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर १५ ऑगस्ट २०२१ पासून म्हणजेच मागील एका वर्षांपासून संपूर्ण देशभरात ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत देशात सरकार कडून विविध उपक्रम राबवत आहेत. या उपक्रमांना जनतेचा सुद्धा उत्तम प्रतिसाद मिळाला. २०२२ च्या स्वातंत्र्य दिनाला आता काहीच दिवस राहिले आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत असल्याचा उत्साह आणि या स्वातंत्र्याचा रंग संपूर्ण देशावरच चढला आहे.

- Advertisement -

स्वातंत्र्य दिनाच्या या उत्सवात जनतेसोबतच अनेक सेलिब्रेटी सुद्धा सहभागी होण्यासाठी सज्ज आहेत. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी नुकतंच त्यांच्या ट्विटर वरून एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात ‘हर घर तिरंगा’ (har ghar tiranga) चं गाणं आहे. जेष्ठ गायिका अशा भोसले(asha bosale), गायक सोनू निगम(sonu nigam), जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन(amitabh bachachan) यांच्या सह अनेक सेलिब्रिटींच्या स्वरसाजाने हे गाणं सजलं आहे.

हे ही वाचा – ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ६ लाख झेंड्यांचे वाटप

- Advertisement -

बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन(amitabh bachachan) यांनी त्यांच्या ट्विटवर अकाऊंटवरून ‘हर घर तिरंगा’ हे गाणं पोस्ट केलं आहे. हे गाणं जेष्ठ गायिका अशा भोसले आणि गायक सोनू निगम,अमिताभ बच्चन यांनी सुरेल आवाजात गायलं आहे. त्यांच्यासोबतच या गाण्यात  अनुष्का शर्मा, विराट कोहली, अक्षय कुमार(akshay kumar ), प्रभास (prabhas), कीर्ती सुरेश आणि नीरज चोप्रा(niraj chopra) हे सेलिब्रिटी झळकणार आहेत.

हे ही वाचा – ‘हर घर तिरंगा चळवळ’ मजबूत करण्याचे पंतप्रधान मोदींचे आवाहन; जाणून घ्या 22 जुलैचीच निवड का?

‘हर घर तिरंगा'(har ghar tiranga) या गाण्याला अमिताभ यांनी सुद्धा आवाज दिला आहे. त्यावेळी त्यांनी कॅप्शन सुद्धा दिले आहे. ‘तिरंगा माझा अभिमान, तिरंगा माझा आत्मा… तिरंगा माझी ओळख… तिरंगा माझे सर्वस्व आहे.’ असं कॅप्शन सुद्धा अमिताभ बच्चन यांनी लिहिलं आहे. त्याच बरोबर अमिताभ बच्चन म्हणाले, की या गाण्यातील काही शब्द मी सुद्धा गायले आहेत. त्याचबरोबर अमिताभ बच्चन यांनी देशातील जनेतला सुद्धा तिरंगा फडकविण्याचे आवाहन केले आहे.

हे ही वाचा – Independence Day 2022: तिरंग्यातील अशोक चक्राचा रंग निळा का असतो? काय आहे महत्त्व?

भारताचे(india) पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM narendra modi) हे प्रत्येक रविवारी ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील जनतेशी संवाद साधतात. अशातच ३१ जुलै रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला आवाहन केल. ‘हर घर तिरंगा’ या अभियाना अंतर्गत १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान प्रत्येक घरात ध्वज फिडकविण्याचे आवाहन केले आहे. त्याच बरॊबर २ ऑगस्ट पासून प्रत्येकाने आपल्या सोशल मीडियावर डीपी म्हणून ठेवण्याचे आवाहन केले आहे.

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -