घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसावधान ! नाशिक शहरात तापाची ‘व्हायरल’ साथ

सावधान ! नाशिक शहरात तापाची ‘व्हायरल’ साथ

Subscribe

तीन हजारांवर रुग्ण; अतिसाराची रुग्णसंख्याही हजारपार

नाशिक : बदलते हवामान आणि डासांचा प्रादुर्भाव यामुळे शहरपरिसरात व्हायरल तापसदृश आजाराच्या साथीने धुमाकूळ घातला आहे. या आजाराच्या तीन हजारांहून अधिक रुग्णांची नोंद महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये झाली असून खासगी रुग्णालयांमधील व्हायरल तापाच्या रुग्णांचा आकडा यापेक्षा कितीतरी पटीने मोठा असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. डेंग्यू आणि स्वाईन फ्लूचा प्रादुर्भावही वाढू लागल्याने नाशिककरांचे आरोग्य संकटात सापडले आहे. अतिसाराच्या रुग्णांचा आकडा देखील हजारावर पोहोचला आहे.

पावसाळा सुरू झाल्यानंतर ठिकठिकाणी साचणाजया पाण्याच्या डबक्यांमुळे डासांचा उच्छाद वाढला आहे. यामुळे डेंग्यू, मलेरिया सारख्या किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव शहरात वाढू लागला आहे. गेल्या दोन वर्षांनंतरच प्रथमच स्वाईन फ्लूचेही रुग्ण नाशकात आढळले आहेत. जुन महिन्यात स्वाईन फ्लुचे २ रुग्ण आढळले होते. जुलै महिन्यात स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या २३ वर जाऊन पोहोचली आहे. पाठोपाठ डेंग्यूचाही डंख लागला आहे. जुलै महिन्यात डेंग्यूचे २४ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ७४ वर पोहचली आहे. पावसाने उघडीप दिली असली तरी, बदलत्या वातावरणाचा परिणाम तापसदृश आजाराच्या रुग्णसंख्येवाढीवर झाला आहे. शहरात तापासाची साथ आली असून सदर आजार हवेतून पसरणारा ‘व्हायरल’ स्वरूपाचा असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. महापालिकेच्या रुग्णालयात जुलै महिन्यात तापसदृश आजाराच्या ३०५८ रुग्णांची नोंद झाली आहे. तर चिकनगुनियाचे देखील २ रुग्ण आढळून आले आहेत.

- Advertisement -

खाजगी रुग्णालयही फुल्ल

नाशिक महापालिकेच्या रुग्णालयांपाठोपाठ शहरातील खासगी रुग्णालये देखील व्हायरल तापसदृश आजाराच्या रुग्णांनी ओसांडून वाहत आहेत. ताप, सर्दी, अंगदुखी, डोकेदुखी अशी या आजाराची लक्षणे आहेत. नागरिकांनी अशाप्रकारची लक्षणे आढळल्यास नजीकच्या दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावेत, असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -