घरमहाराष्ट्रउद्धव ठाकरे पुन्हा सामनाचे संपादक, संजय राऊत कार्यकारी संपादकपदी कायम

उद्धव ठाकरे पुन्हा सामनाचे संपादक, संजय राऊत कार्यकारी संपादकपदी कायम

Subscribe

आता संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर ठाकरेंनी संपादकपदाची जबाबदारी स्वतःकडे घेतली आहे.

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या सामनाच्या संपादकपदी पुन्हा नियुक्ती झाली आहे. तर, कार्यकारी संपादकपदी संजय राऊत कायम राहिले आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यानंतर सामनाच्या संपादकपदाची कमान रश्मी ठाकरे यांच्याकडे सोपवली होती. आता संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर ठाकरेंनी संपादकपदाची जबाबदारी स्वतःकडे घेतली आहे. (Uddhav Thackeray appointed as a Editor of Samana again)

मार्च २०२० पासून सामनाचे संपादकपद रश्मी ठाकरे यांच्याकडे होते. मात्र, आता संजय राऊत यांना ईडीने अटक केल्याने अग्रलेख आणि रोखठोक हे सदर कोण लिहिणार असा प्रश्न पडला होता. अग्रलेख लिहिण्याची परवानगीही संजय राऊतांनी मागितली होती. मात्र, त्यांची ही मागणी फेटाळण्यात आली. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांची लेखणी सामनातून वाचायला मिळणार का असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

- Advertisement -

दरम्यान, आज पहिल्यांदाच सामनाच्या पहिल्या पानावर जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसाची जाहिरात लावण्यात आली आहे. पहिल्यांदाच दुसऱ्या पक्षाच्या नेत्याची जाहिरात सामनामध्ये पहिल्या पानावर आल्याचं अनेकजण सांगत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -