घरताज्या घडामोडीआदित्य ठाकरेंच्या 'मतदारांची हंडी' फोडण्यासाठी आशिष शेलारांचे वरळीत थर

आदित्य ठाकरेंच्या ‘मतदारांची हंडी’ फोडण्यासाठी आशिष शेलारांचे वरळीत थर

Subscribe

गोपाळकाला उत्सव(दहिहंडी) आता अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. राज्यभरातील गोविंदा पथकांनी थरांची तयारी केली असून, दहिहंडी फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र, आता राज्यात या दहिहंडीवरून राजकारण सुरू झाले आहे.

गोपाळकाला उत्सव(दहिहंडी) आता अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. राज्यभरातील गोविंदा पथकांनी थरांची तयारी केली असून, दहिहंडी फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र, आता राज्यात या दहिहंडीवरून राजकारण सुरू झाले आहे. मुंबईत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी भव्य दहीहंडी (Dahi Handi 2022) सोहळ्याचे आयोजन केले आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या वरळीतील मतदारांची हंडी आशिष शेलार फोडणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपा आमदार आशिष शेलार यांची मुंबई भाजपा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. भाजपा मुंबईचे अध्यक्षपद स्विकारताच आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या मुंबईतील वरळी (Worli) या मतदारसंघात भाजपने भव्य दहीहंडी (Dahi Handi 2022) सोहळ्याचे आयोजन केले आहे. वरळीच्या जांबोरी मैदानात भाजपची दहीहंडी होणार आहे.

- Advertisement -

आशिष शेलार यांनी वरळीच्या जांबोरी मैदानात दहिहंडीचे आयोजन केल्याने शिवसेनेला वरळीतील दहिहंडीच्या आयोजनासाठी जागा शोधावी लागत आहे. विशेष म्हणजे वरळीमध्ये शिवसेनेचे तीन आमदार आहेत. त्यामुळे शिवसेनेची ताकद असतानाही आता आशिष शेलार यांनी दहिहंडीचे आयोजन केल्याने भाजपा आणि शिवसेना यांच्यातील वरळी मतदारसंघातील वाद वाढण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचे आमदार, नगरसेवक असतानाही भाजपाची बाजी आशिष शेलार यांचे निकटवर्तीय संतोष पांडे यांनी या दहीहंडी सोहळ्याचे आयोजन केले आहे. येत्या शुक्रवार 19 ऑगस्ट रोजी वरळीच्या जांबोरी मैदाना हा दहीहंडी सोहळा होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘वंदे मातरम्’च्या वादात नाना पटोलेंची उडी, ‘जय बळीराजा’ने संभाषण सुरू करण्याचे कार्यकर्त्यांना आदेश

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -