घरताज्या घडामोडीचतूर राजकारणी असल्यानेच..., भाजपने गडकरींना वगळल्यानंतर राष्ट्रवादीची टीका

चतूर राजकारणी असल्यानेच…, भाजपने गडकरींना वगळल्यानंतर राष्ट्रवादीची टीका

Subscribe

भाजपाने संसदीय मंडळातील सदस्यांची यादी बुधवारी जाहीर केली. यामध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि केंद्रीय मंत्रीमंडळातील नितीन गडकरी यांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे भाजपावर टीकास्त्र सोडलं जात आहे. नितीन गडकरी केंद्रात पोहोचलेले महाराष्ट्रातील चतूर राजकारण असल्यानेच त्यांचा पत्ता कट केला असल्याचा आरोप केला जातोय. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे क्लाईड क्रास्टो यांनीही भाजपाच्या नेतृत्त्वावर टीका केली आहे.

हेही वाचा भाजपाच्या संसदीय समितीची घोषणा, नितीन गडकरींना वगळले

- Advertisement -

नितीन गडकरी यांची संसदीय समितीत निवड झालेली नाही. एक चतूर राजकारणी म्हणून नितीन गडकरी यांनी मोठी झेप घेतली आहे, हेच यातून सिद्ध होतंय. कारण, जेव्हा तुमची क्षमता वाढते आणि पक्षश्रेष्ठींसाठी आव्हान ठरता तेव्हा भाजपाकडून तुमचं महत्त्व कमी केलं जातं. तर, कलंकित लोकांना संधी दिली जाते.


भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळासोबतच केंद्रीय निवडणूक समितीची नवी यादी बुधवारी जाहीर करण्यात आली. या दोन्ही केंद्रीय समित्या पक्षाचे ध्येयधोरण ठरविण्याच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. यापैकी निवडणूक समितीची भूमिका तर तिकीट वाटपात अत्यंत महत्त्वाची असते. या दोन्ही समित्यांमधून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान या दोघांनाही वगळण्यात आले आहे.

- Advertisement -

त्यामुळे भाजप गडकरींना हळूहळू केंद्रीय स्तरावरील समित्यांमधून परिणामी राजकारणातून दूर ढकलत आहे का? याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी नागपुरातील एका कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी सध्याच्या राजकारण्यांनी राजकारण हे समाजकारण आहे, राष्ट्रकारण आहे, विकासकारण आहे की सत्ताकारण आहे हे समजावून घेण्याची आवश्यकता असल्याचे वक्तव्य केले होते. भ्रष्टाचार असो वा जनतेची कामे गडकरींनी अनेकदा पक्षाच्या व्यासपीठावरून विरोधकांसोबतच पक्षातील नेत्यांचेही कान टोचल्याची अनेक उदाहरणे आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -