घरताज्या घडामोडीशिवसेनेचा बॅनर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फाडला; मुंबईत राजकीय वातावरण पेटण्याची शक्यता

शिवसेनेचा बॅनर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फाडला; मुंबईत राजकीय वातावरण पेटण्याची शक्यता

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर मुंबईसह राज्यभरात शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील वाद चिघळत चालला आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपाचे बेस्ट स्टॉपवरील बॅनर फाडला होता. युवासेनेच्या वरळीतील पदाधिकाऱ्यांनी भाजपा बॅनर फाडून निषेध केला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर मुंबईसह राज्यभरात शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील वाद चिघळत चालला आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपाचे बेस्ट स्टॉपवरील बॅनर फाडला होता. युवासेनेच्या वरळीतील पदाधिकाऱ्यांनी भाजपा बॅनर फाडून निषेध केला होता. त्याला आता भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रत्युत्तर देत शिवसेनेचा बॅनर फाडला आहे. भाजपा मुंबई युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंह तिवाना यांच्या नेतृत्वात भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा बॅनर फाडला. (shiv Sena banner on the Best stop was torn by BJP Yuva Morcha in Mumbai)

येत्या काळात आगामी मुंबई महापालिका निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत शिवसेना-भाजपा यांच्यातील वाद आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे. मुंबईतील शिवसेनेचे वर्चस्व संपवण्यासाठी भाजपा सातत्याने प्रयत्न करताना दिसत आहे. त्यामुळे येत्या काळात शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.

- Advertisement -

“नियमाने परवानगी घेऊन आमच्या नेत्यांचे लावण्यात आलेले बॅनर काढणे आणि त्या बॅनरवर बॅनर लावणे बंद करा अन्यथा हिंदुविरोधी नकली शिवसेनेला जशास तसे उत्तर देऊ त्यासाठी भाजपा युवा मोर्चा सक्षम आहे”, असे तेजिंदर तिवाना यांनी म्हटले.

मुंबईच्या ताडदेव परिसरात युवासेनेकडून अरुण दुधवडकर यांची शिवसेना उपनेतेपदी निवड झाल्याबद्दल शिवसेनेने बेस्ट स्टॉपवर बॅनर लावला होता. हा बॅनर भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत फाडून टाकला. याच बॅनरखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सवानिमित्त नागरिकांना शुभेच्छा देणारा बॅनर होता.

- Advertisement -

याआधी युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी वरळीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बॅनर फाडला होता. त्यावेळी भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला होता. बॅनर फाडणे ही फालतुगिरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची असू शकते. आम्ही बॅनर फाडायचे ठरवले तर मातोश्रीच्या बाहेरचेही बॅनर फाडू पण ही आमची संस्कृती नाही. त्या बॅनरवर गणपती बाप्पाचा फोटो आहे त्यामाध्यमातून गणेश भक्तांचे स्वागत करण्यात आले होते. हे बॅनर कुणी लावले त्यापेक्षा त्यामागची भावना काय हे समजून घ्यायला हवे होते. यावर आदित्य ठाकरे जे उत्तर देतात ते बालिशपणाचे लक्षण आहे, असे लाड यांनी म्हटले होते.


हेही वाचा – उपराज्यपालांनी पाठवलेली मानहानीची नोटीस संजय सिंहांनी भर पत्रकार परिषदेत फाडली

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -