घरताज्या घडामोडी1 नोव्हेंबरला होणार महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी

1 नोव्हेंबरला होणार महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी

Subscribe

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी महिनाभर लांबणीवर गेली आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील पुढील सुनावणी आता 1 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी महिनाभर लांबणीवर गेली आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील पुढील सुनावणी आता 1 नोव्हेंबर रोजी होणार आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये न्यायालयाच्या कामकाजामध्ये अनेक सुट्ट्या असल्याने सुनावणी महिनाभर पुढे ढकलल्याचे समजते. (next hearing of the Maharashtra political crisis will be held on November 1)

मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यामध्ये न्यायालयाच्या कामकाजामध्ये अनेक सुट्ट्या आहेत. नवरात्रीची 9 दिवसांची सुट्टी आहे. तसेच, त्यानंतर दिवाळीच्या सुट्ट्या आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज पुढे ढकलण्यात आले आहे.

- Advertisement -

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर मंगळवारी महत्त्वाची सुनावणी झाली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला पक्षचिन्हावर निर्णय घेण्याची मुभा दिली. परंतु, अनेक मुद्द्यांवरची याचिका अजूनही न्यायालयात प्रलंबित आहे.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षासंबंधी दहा मुद्द्यांवर सुनावणी होणार आहे. राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी ही सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुरु आहे. आता या सुनावणीची पुढची तारीख 1 नोव्हेंबर रोजी आहे. राज्याच्या दृष्टीने ही अत्यंत महत्वाची बातमी आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षासंबंधी दहा मुद्द्यांवर न्यायालय काय निर्णय घेणार हे 1 नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार आहे.

- Advertisement -

मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी होणार होती. मात्र, न्यायालयाच्या कामकाजात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतचे प्रकरण आले नाही. त्यामुळे याप्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याचे समजते. परिणामी निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


हेही वाचा – स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टातली सुनावणी लांबणीवर

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -