घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रभुजबळांनी केली कालिका मंदिरातील सरस्वतीचीही आरती

भुजबळांनी केली कालिका मंदिरातील सरस्वतीचीही आरती

Subscribe

नाशिक : सरस्वती महापुरूषांचे फोटो लावण्याबाबत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी वक्तव्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. असे असताना शनिवारी (दि.१) भुजबळांनी नाशिकमधील श्री कालिका मातेचे दर्शन घेत आरती केली. यावेळी कालिकेसह देवी सरस्वतीचेही त्यांनी पूजन केले. विश्वस्तांच्या वतीने भुजबळांना देवी लक्ष्मी, माँ काली आणि सरस्वतीची प्रतिमा भेट देण्यात आली.

फुले, आंबेडकर, शाहू, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे फोटो शाळांमध्ये लावले पाहिजेत. कारण त्यांनी शिक्षणाचा अधिकार दिला. परंतु, सरस्वतीचा फोटो, शारदा मातेचा फोटो लावतात. जिला आम्ही कधी पाहिले नाही. त्यांची पूजा कशासाठी करायची ?, असे वक्तव्य भुजबळ यांनी केले होते. या वक्तव्यावरून भाजपने भुजबळांविरोधात आंदोलन केले. हा वाद सुरू असतानाच नवरात्रीनिमित्त शनिवारी भुजबळांनी नाशिकमध्ये श्री कालिका मंदिरात आरती करत कालिका मातेचे दर्शन घेतले. कालिका मंदिरात देवी लक्ष्मी, माँ काली, देवी सरस्वतीची मूर्ती आहे. यावेळी देवी सरस्वतीचे आपण पूजन केल्याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, या ठिकाणी सरस्वती मातेची मूर्ती आहे की नाही याची आपल्याला कल्पना नाही. मात्र, आपण कालिकादेवीच्या दर्शनासाठी आल्याचे सांगत पुन्हा एकदा आपल्या भूमिकेवर ते ठाम असल्याचे त्यांनी अप्रत्यक्ष बोलून दाखवले. मी दरवर्षी कालिका मातेच्या दर्शनासाठी येत असतो. पर्यटनमंत्री असताना येथे आपण अनेक सोयी केल्या. भक्तनिवास बांधले. सरस्वती पूजनाबद्दल शाळेत महापुरूषांचीही पूजा करा, एवढेच माझे म्हणणे आहे, असेही भुजबळ म्हणाले. आई जगदंबे आम्हाला सोडव आणि आम्हाला शांती-समाधान लाभू दे, अशी प्रार्थना कालिका देवीच्या चरणी केल्याची मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -