घरमनोरंजनमला एका शेखने 'घटिया औरत' म्हटले...केतकी चितळेची 'ती' पोस्ट चर्चेत

मला एका शेखने ‘घटिया औरत’ म्हटले…केतकी चितळेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Subscribe

नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेली केतकी चितळे आता पुन्हा एकदा तिच्या आणखी एका वक्तव्यांमुळे चर्चेत आली आहे. सध्या संपूर्ण देशभरात दिल्लीतील महरौली परिसरात झालेले श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरण चर्चेत आहे. या धक्कादायक प्रकरणानंतर अनेकांचा थरकाप उडाला आहे. मुंबईमध्ये राहणारी आफताब अमीन पूनावाला नावाच्या मुलाने आपली प्रियसी श्रद्धा वालकरची गळा दाबून हत्या केली आणि त्यानंतर तिच्या मृत शरीराचे 35 तुकडे करुन छतरपूरमधील जंगलामध्ये वेग-वेगळ्या ठिकाणी फेकून दिले. ही विकृत घटना समोर आल्यानंतर प्रत्येकजण बिथरुन गेला आहे. दरम्यान, याच संदर्भात केतकी चितळेने देखील आपलं मत व्यक्त केलं होतं,मात्र त्यानंतर अनेकांनी तिच्या ट्रोल केलं.

- Advertisement -

केतकी चितळेने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये तिने लिहिल होतं की, “मेरा अब्दुल ऐसा नहीं. बरोबर आहे. कारण आप मेलं, जग बुडालं. पण 35 तुकडे होताना, गळा दाबला जाताना तरी कुठे तरी पश्चात्ताप होत असेल ना? कुटुंबियांची आता काय मानसिक स्थिती असेल याचा तर विचार केल्यास अंगावर काटा येतोय. मुलींनो, तुम्ही शेवटचा श्वास घेताना डोळे उघडून पुन्हा (या वेळी कायमचे) मिटणार आहात? का आता तरी निद्रा मोडणार आहात?!!!? #जागोमेरेदेश”, असं केतकीने पोस्टमध्ये लिहिलं होतं.

मात्र, तिच्या या पोस्टमुळे नेटकरी तिला ट्रोल करु लागले आहेत. दरम्यान, एका नेटकऱ्याने केतकीला इंस्टाग्रामवर पर्सनल मॅसेज करुन तिला “केतकी, तुम एक नंबर की घटिया औरत हो” असं म्हटलं आहे. या मॅसेजचा स्क्रिनशॉर्ट केतकीने तिच्या स्टोरीला शेअर केलं आहे.

- Advertisement -

त्यानंतर केतकी त्याला म्हणाली की, “वेगळं काहीतरी सांग जे मी याआधी कधी वाचलं नाही.” त्यावर त्याने तिला “तू जे आहेस तेच मी बोलतोय”

 त्यानंतर केतकीने एक स्टोरी शेअर करत लिहिलंय की, “मला एखाद्या शेखने ‘घटिया औरत’ म्हटले याचा मला अभिमान आहे. यातून हेच सिद्ध होतयं की, ते लोक सनातनी महिलांचा द्वेष करतात. #Girls_Wakeup” सध्या केतकीची ही पोस्ट व्हायरल होत असून अनेकजण यावर कमेंट्स करत आहेत.

 


हेही वाचा :

श्रद्धा वालकर हत्याकांडप्रकरणी अभिनेत्री स्वरा भास्करने व्यक्त केला संताप

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -