घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगर'या' शहरात आजपासून १९ रिक्षा संघटनेच्यावतीने बेमुदत बंद

‘या’ शहरात आजपासून १९ रिक्षा संघटनेच्यावतीने बेमुदत बंद

Subscribe

पुण्यातील रिक्षा चालकांच्या बेमुदत संपाच्या आंदोलनानंतर आता औरंगाबादमधील रिक्षा चालकांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. रिक्षा मीटर कॅलीब्रेशनसाठी तीस दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ मार्च २०२४ पर्यंत करावी, रिक्षा थांबे देण्यात यावे, रिक्षा पीक अप आणि ड्रॉप पॉईंट देण्यात यावे.

पुण्यातील रिक्षा चालकांच्या बेमुदत बंदच्या आंदोलनानंतर आता औरंगाबादमधील रिक्षा चालकांनी बेमुदत बंदाची हाक दिली आहे. रिक्षा मीटर कॅलीब्रेशनसाठी तीस दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ मार्च २०२४ पर्यंत करावी, रिक्षा थांबे देण्यात यावे, रिक्षा पीक अप आणि ड्रॉप पॉईंट देण्यात यावे. या मागण्यांसाठी १९ रिक्षा संघटनेच्यावतीने औरंगाबाद रिक्षा चालक मालक कृती समितीने आजपासून रिक्षा बंदचे आवाहन केले आहे. (Rickshaw Shutdown In Aurangabad Today 19 Rickshaw Unions On Indefinite Strike From December 1)

औरंगाबादमधील १९ रिक्षा संघटनेचा रिक्षा बंदला पाठिंबा असल्याचे समजते. औरंगाबाद रिक्षा चालक मालक कृती समितीत बहुजन हिताय रिक्षाचालक-मालक संघटना, शिव वाहतूक सेना, वस्ताद वाहतूक दल, अखिल भारतीय भ्रष्ट्राचार विरोधी रिक्षाचालक-मालक संघटना, वाय एफ रिक्षा युनियन, परिवर्तन अॅटो चालक-मालक संघटना, महाराष्ट्र रिक्षाचालक सेना, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना, काँग्रेंस रिक्षा युनियन, पँथर पॉवर रिक्षाचालक-मालक संघटना, महाराष्ट्र वाहतूक सेना, मराठ मावळा संघटना आणि रिपाई चालक मालक संघटना अशा संघटनांचे नाव जाहिर करण्यात आले आहे.

- Advertisement -

औरंगाबाद रिक्षाचालक-मालक कृती समितीने दिलेल्या निवेदनात रिक्षा मीटर कॅलिब्रेशनसाठी २८ मार्चपर्यंत मुदतवाढ करावी. रिक्षा चालक व मालकांना आधार मिळणार आहे. याशिवाय रिक्षा चालकांना रिक्षाचे इन्श्युरन्स, पीयूसी, टॅक्स, मीटर कॅलीब्रेशन, वाहन पासिंग करण्यासाठीही २८ मार्चपर्यंत मुदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.

औरंगाबादवरील रिक्षाचालकांवर प्रवासी सोडण्यासाठी थांबलेले असताना, त्यांच्या विरोधात २८३ अंतर्गत पेालिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. कागदपत्राबाबत वाहतूक पोलिसांनी केलेली कारवाई बंद करावी. रिक्षाचालकांना गुन्हेगार बनविण्याचे कारस्थान सुरू असल्याचा आरोप करून कंपनीसाठी कामगाराची वाहतूक करणाऱ्या बसमधून अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. त्यांच्यावर संबंधीत विभागाकडून कारवाई होत नसल्याचाही आरोप रिक्षाचालक संघटनांकडून करण्यात आला आहे. शहरात रिक्षा चालविण्यासाठी आरटीओ विभागाकडून परवाने दिले जात आहे. मात्र, रिक्षा थांबे निश्चित करण्यात येत नाही. तसेच शासनाकडून अधिकृत प्रवासी वाहतूक परवानगी असताना रिक्षा चालकांना प्रवासी सोडण्यासाठी पीक अप आणि ड्रॉप पॉईंट देण्यात येत नाही. आधी अधिकृत रिक्षा स्टॅँड द्या. त्यानंतर दंडात्मक कारवाई करा.

- Advertisement -

बुधवारी आरटीओ कार्यालयात रिक्षाचालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आरटीओ संजय मैत्रेवार यांनी घेतली. या बैठकीत रिक्षा चालकांच्या मागणीनुसार ३० दिवसाची मुदतवाढ देण्यात येत असल्याचे जाहीर केले. गेल्या तीन वर्षांपासून रिक्षाचालकांवर कारवाई बंद आहे. यामुळे शहरात बेशिस्तीत वाढलेली आहे. यामुळे रिक्षा विरोधात सुरू असलेली कारवाई थांबणार नसल्याचे स्पष्ट उत्तर आरटीओ विभागाकडून देण्यात आले.

एक डिसेंबर पासून पुकारण्यात आलेल्या रिक्षा बंद आंदोलनात अत्यावश्यक सेवामधील रिक्षा चालू ठेवण्यात येणार असल्याची माहिती रिक्षाचालक-मालक कृती समितीने जाहीर केले आहे. या रिक्षा वगळता अन्य रिक्षा बंद राहतील, अशीही घोषणा करण्यात आली आहे.


हेही वाचा – Gujarat Election 2022 : पहिल्या टप्प्यात आज 89 जागांसाठी मतदान, 788 उमेदवार रिंगणात

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -