घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रहै तय्यार हम...रोमहर्षक दीक्षांत सोहळा; काम्बॅक्ट आर्मी एव्हीएशनची ३८वी तुकडी लष्करी सेवेत

है तय्यार हम…रोमहर्षक दीक्षांत सोहळा; काम्बॅक्ट आर्मी एव्हीएशनची ३८वी तुकडी लष्करी सेवेत

Subscribe

नाशिक : शिस्तबद्ध पडणारी पाऊल, अभिमानाने भरून आलेला ऊर, देशसेवेसाठी सज्ज झालेले तरुण अशा वातावरणात गांधीनगर येथील कॉम्बॅक्ट एव्हिएशन स्कूलमध्ये ३८ व्या तुकडीच्या दीक्षांत सोहळा पार पडला. नाशिकच्या गांधीनगर लष्करी तळावर युद्धभूमीचा थरार अनुभवायला मिळाला. निमित्त होतं, कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या (कॅट्स) लढाऊ वैमानिकांच्या दीक्षांत सोहळ्याचे.

यावेळी लष्करी थाटात मान्यवरांच्या हस्ते ३८ वैमानिकांना एव्हिएशन विंग व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी आपल्या पाल्याचे कौतुक पाहण्यासाठी पालकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती. यावेळी आर्मी एव्हिएशन कोरचे महानिर्देशक लेफ्टनंन्ट जनरल अजय कुमार सुरी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कॅटरचे बिग्रेडीअर संजय वढेरा आणि एव्हिएशन डीजी डी. के. चौधरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी स्कुलच्या इतिहासात प्रथमच हे तिन्ही कोर्स पूर्ण केलेल्या अधिकार्‍यांनी एकत्रित पथसंचलनाचे सादरीकरण केले. लेफ्टनंन्ट जनरल सुरी यांनी मार्गदर्शन करताना सैन्यदलात बदलत्या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने धुव्रसारखी हलक्या वजनाची हॅलिकॉप्टरची निर्मिती करण्यात येत असून देशासाठी ही कौतुकास्पद बाब आहे. सैन्यदलात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिलादेखील विविध पदांवर कार्यरत असून देशाला त्यांचा अभिमान आहे. वायुदलात प्रशिक्षण पूर्ण करणार्‍या प्रशिक्षणार्थींनी देशसेवेसाठी तत्पर राहावे, असा सल्लाही सुरी यांनी प्रशिक्षार्थींना केला. यावेळी लष्कराच्या चित्तथरारक कसरतींनी सर्वांचे लक्ष वेधले.

- Advertisement -
३८वी तुकडी

कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कुलमध्ये ५६ अधिकार्‍यांनी खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. यामध्ये ३२ अधिकार्‍यांनी कॉम्बेट एविएटर्स कोर्स पूर्ण केला. सात अधिकार्‍यांनी क्वालिफाईड फ्लाईंग इंस्ट्रक्टर तर १८ अधिकार्‍यांनी बेसिक रिमोटली पायलटेड एअरक्राफ्ट फ्लाईंग इंस्ट्रक्टरचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण घेणार्‍यांमध्ये ४ महिला अधिकार्‍यांचा समावेश आहे. त्यात तीन महिला कॅप्टनपदी व १ मेजरपदी आहे. यासर्वांचा समारंभपूर्वक वायुदलात समावेश करण्यात आला. विशेष म्हणजे नायजेरियाचे मेजर ऑफोदिल यांनीही प्रशिक्षण घेतले.यामध्ये शत्रुंवर हवाई हल्ला करणे, जमिनीवरील सैन्याला रसद पुरविणे, जखमींना सुरक्षित ठिकाणी उपचारार्थ हलविणे आदीसह विविध प्रात्याक्षिके सादर करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -