घरमहाराष्ट्रनाशिकहिंमत असेल सुरक्षेविना फिरून दाखवा, संजय राऊतांचे शिंदे गटातील आमदारांना आव्हान

हिंमत असेल सुरक्षेविना फिरून दाखवा, संजय राऊतांचे शिंदे गटातील आमदारांना आव्हान

Subscribe

सुरक्षेशिवाय फिरण्याची हिंमत दाखवा. तुम्ही सुरक्षेत फिरताय याचा अर्थ तुम्हाला भीती आहे. जनता खवळलेली आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.

नाशिक – शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी एकनाथ शिंदे गटावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. हिंमत असेल तर सुरक्षेविना फिरून दाखवा, असा इशाराच संजय राऊतांनी केला आहे. आम्ही बघा सुरक्षेविना बिनधासत्पणे फिरू शकतोय, असंही ते म्हणाले. नाशिक दौऱ्यावर असताना आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी विविध मुद्द्यांवर त्यांनी आक्रमकपणे आपली मते मांडली.

हेही वाचा – ‘मित्र’च्या उपाध्यक्षपदी अजय आशर आणि डॉ. राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती

- Advertisement -

गद्दारांपैकी कोण काय बोलतंय याचं मला काही पडलेलं नाही. ४० नेते गेले असले तरी पक्ष तिथंच आहे. पालापाचोळा उडून गेल्यानं शिवसेनेला फरक पडत नाही. तुम्ही कितीही खोके द्या. जनता खोक्याला विकली जात नाही हे लक्षात ठेवा. आज सत्ता असल्यानं तुमच्याकडे सुरक्षा व्यवस्था आहे. आमची सुरक्षा काढली. आम्हाला कोणी हात लावतंय का? आम्ही एकटं फिरतोय मर्दासारखं. आम्ही म्हणतो का सुरक्षा द्या म्हणून? सुरक्षेशिवाय फिरण्याची हिंमत दाखवा. तुम्ही सुरक्षेत फिरताय याचा अर्थ तुम्हाला भीती आहे. जनता खवळलेली आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.

हेही वाचा इतिहासाचा चुथडा करणार आणि दोष राष्ट्रवादीला देणार का? जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंना सवाल

- Advertisement -

मी गद्दार किंवा खोकेवाल्यासांठी पत्रकार परिषद घेतली नाही. यांच्या कपाळावर गद्दारीचा शिक्का बसला आहे. जसं दिवार सिनेमात अमिताभच्या हातावर गोंदलं होतं, मेरा बाप चोर है, तसं यांचे नातेवाईक, यांचे पोरं यांच्या बायका यांना उद्या लोकं म्हणतील हे गद्दारांचे नातेवाईक आहेत. त्यांच्या कपाळावर गद्दारीचा शिक्का बसला आहे. यांच्या पिढ्या न पिढ्यांना ही गद्दारी शांतपणे बसू देणार नाही, असंही संजय राऊत म्हणाले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -