घरक्राइममुंबईत प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीचा काढला काटा, स्लो पॉयझनचा वापर

मुंबईत प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीचा काढला काटा, स्लो पॉयझनचा वापर

Subscribe

मुंबईतील सांताक्रूझमधील एका पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची स्लो पॉयझन देऊन निघृण हत्या केली आहे. गारमेंट व्यावसायिक कमलकांत शाह असे मृत पतीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी पत्नी काजल शाह (46) आणि तिचा प्रियकर हितेश जैन (45) या गुरुवारी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पत्नी काजल शाह आणि तिचा प्रियकर हितेशला मलकांत शाहची मालमत्ता हडप करायची होती. यासाठी तिने विमा एजन्सीकडे पती कमलकांतच्या पॉलिसीबाबत चौकशी केली होती. दरम्यान शाह यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टनंतर दोघांना अटक केली आहे. या दोघांनी कमलकांतची हत्या करण्यासाठी त्याला अन्नातून थॅलिअम आणि आर्सेनिक हे स्लो पॉयझ दिले.

मृत कमलकांत शाह यांच्या रक्तात आर्सेनिक आणि थॅलिअमचे प्रमाण अधिक आढळले. यामुळे 19 सप्टेंबर रोजी मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे त्यांची आई सरला शहा यांच्या 13 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूवेळी त्यांनाही तीच लक्षणे आढळली होती, त्यामुळे हे हत्याकांडाचे प्रकरण असल्याचे दिसले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी के एस झंवर यांनी आरोपींना 8 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

पोलिसांना काजल शहा आणि तिचा प्रियकर हितेश जैन यांनी पती कमलकांतच्या हत्येसाठी वापरलेले केमिकल कुठून आणले याची माहिती मिळाली आहे, याप्रकरणी साक्षीदार म्हणून केमिकल विक्रेत्याचा जबाब नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी काजल आणि हितेश यांची जळपास दहा तास स्वतंत्र्यपणे चौकशी केली, यानंतर दोघांना गुन्हा कबुल केला आहे. यानंतर गुरुवारी दोघांना अटक करण्यात आली.

नेमकी घटना काय?

कमलकांत शाह यांना 24 ऑगस्ट रोजी पोटदुखीचा त्रास होऊ लागला. यावेळी त्यांना उलट्या होऊ लागल्या म्हणून त्यांनी फॅमिली डॉक्टरांकडून औषधे घेतली. मात्र वेदना काही केल्या कमी होत नसल्याने त्यांना अंधेरीच्या क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. काही दिवसांपूर्वी अशात पोटदुखीने त्यांच्या आईची मृत्यू झाला होता. मात्र शाह यांनाही वेदना असह्य झाल्याने त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

- Advertisement -

यावेळी त्याचे एक एक अवयव निकामी होऊ लागल्याने डॉक्टरही घाबरले. यावेळी डॉक्टरांना त्यांच्या रक्तात धातूचा संशय आला. यावेळी त्यांच्या रक्ताचे नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले. 13 सप्टेंबरला आलेल्या रिपोर्टमध्ये त्यांच्या शरीरात आर्सेनिकचे प्रमाण सामान्य पातळीपेक्षा 400 पटीने जास्त, तर थॅलियम साधारण पातळीपेक्षा 365 पटीने जास्त असल्याचे आढळले. यावर डॉक्टरांनी त्यांना कोणीतरी तोंडावाटे हे विषारी पदार्थ दिल्याचे शाह यांचे मेहुणे (बहिणीचे यजमान) अरुण लालवानी यांनी सांगितले.

मात्र अवयव निकामी झाल्यामुळे शाह यांचा 19 सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. यानंतर त्यांच्या पोस्टमॉर्टम अहवालाच्या आधारे आझाद मैदान पोलिसांनी अपघाती मृत्यू अहवाल (ADR) नोंदवला गेला. ज्यावर गुन्हे शाखेच्या युनिट 9 ने समांतर तपास सुरू केला. भावाप्रमाणे आईचाही अशाप्रकारे हत्या केल्याचा आरोप शाह यांची बहिण विता लालवानी यांनी केला आहे. यावेळी गुन्हे शाखेने त्यांच्या कुटुंबियांचा जबाब नोंदवत शाह यांचा शवविच्छेदन अहवाल आणि डॉक्टरांच्या निरीक्षणांचा तपास केला. तसेच शाहांच्या कुटुंबीयांचे कॉल डिटेल रेकॉर्ड तपासले.

यात शाह आणि त्यांची पत्नी काजल यांच्यातील संबंध काही ठीक नसल्याचे पोलिसांना समजले. दरम्यान 2021 मध्येही शाह यांनी काजलला तिच्या बालपणीचा मित्र हितेश जैनसोबत वारंवार होणाऱ्या फोन कॉल्सबाबत विचारणा केली.

पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, काजलने तिच्या पतीसोबत भांडण केले आणि ती तिच्या आईकडे राहायला गेली, यापूर्वी 15 जून रोजी काही अटींवर ती पतीसोबत राहत होती. यातील पहिली अट म्हणजे ती पतीसोबत बेडरूम शेअर करणार नाही, तसेच फक्त मुलांसाठी ती परत आली आहे. कविता आणि हितेश यांना शाह यांच्या संपत्तीवर डल्ला मारत स्वत:ची सुटका करुन घ्यायची होती. यासाठी कविताने प्रियकर हितेशसोबत आर्सेनिक आणि थॅलियम मिळवले. हे स्लो पॉयझन तिने आधी सासूच्या आणि नंतर पतीच्या जेवनात मिसळवले. या शाह दाम्पत्याला दोन मुलं आहेत.

शाह यांची प्रकृती गंभीर असताना त्यांच्या कुटुंबियांना पत्नी काजलवर संशय आला, कारण अशा परिस्थितीतही तिने त्याच्यासोबत वाद घालत तातडीने 2 लाख रुपयांची मागणी केली. जेव्हा शाह यांचे कुटुंबिय त्याच्या औषधोपचारांसाठी धावाधाव करत होते तेव्हा कविताने शाह यांना मदत करण्याचे तर सोडा पण कुठलाही भावनिक आधार दिला नाही. उलट ती तिला रक्त तपासणी करण्यास सांगितली तेव्हा ती रुग्णालयातून निघून गेली. यातून तिने पती आणि सासूसारखेच अन्न खाल्ले होते का याचा तपास करायचा होता.


Video : मालाडमधील 21 मजली इमारतीमध्ये भीषण आग; बाल्कनीतून उडी मारत तरुणीने वाचावला जीव

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -