घरताज्या घडामोडीराज्यपालांविरोधात उदयनराजे भोसले आणखी आक्रमक; थेट पंतप्रधानांनाच पाठवलं पत्र

राज्यपालांविरोधात उदयनराजे भोसले आणखी आक्रमक; थेट पंतप्रधानांनाच पाठवलं पत्र

Subscribe

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भाजपच्या खासदारांसोबत नवी दिल्ली येथे बैठक पार पडली. या बैठकीनंतर खासदार उदयनराजे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भाजपाच्या खासदारांसोबत नवी दिल्ली येथे बैठक पार पडली. या बैठकीनंतर खासदार उदयनराजे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उदयराजे यांनी राज्यपालांविरोधात पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले. याआधी उदयनराजे भोसले यांनी रायगडावर जाऊन राज्यपालांविरोधात आंदोलन केले होते. (BJP MP Udayanraje Bhosale talk on Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari Pm Meeting in delhi pm narendra modi)

“२३ नोव्हेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान होत आहे, याबाबत पत्र लिहिले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठवल्यानंतर त्यांना पत्र गृहमंत्रालयाकडे पत्र पाठवले आहे. आज पंतप्रधान कार्यालयाकडे पत्र पाठवलं. या पत्रात कोणत्याही राज्यात घडणारा एखादा प्रकार इतका वाढू नये की, ज्यामुळे तेढ निर्माण होईल, अशी मागणी आम्ही केली आहे”, असे उदयनराजे भोसले यांनी सांगितले

- Advertisement -

“छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचीच नाही तर देशाची अस्मिता आहे. त्यामुळे शिवरायांबद्दल प्रत्येकाने विचारपूर्वक विधान करावे. कारण सध्या राज्यपाल पदावर भगतसिंग कोश्यारी आहेत. देशात जसे राष्ट्रपती हे पद मोठे असते. तसेच, राज्यात राज्यापाल हे पद फार मोठे असते. या पदावर असताना त्यांनी शिवरायांबद्दल असे विधान करणे अपमानास्पद आहे. त्यामुळे यावर लवकरात लवकर तोडगा निघणे गरजेचे आहे. कारण राज्यात सध्या तेढाची परिस्थिती निर्माण झाली आहे, ही थांबून पुन्हा पुर्वरत सर्व शांततापूर्ण वातावरण निर्माण व्हावे, अशी आम्ही पंतप्रधान मोदींकडे मागणी आहे. त्यामुळे लवकरच या मागणीनंतर पंतप्रधानांच्या प्रक्रियेनुसार कारवाई होईल”, असेही उदयनराजे म्हणाले.

महाविकास आघाडी १७ डिसेंबर रोजी आंदोलन करणार आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांविरोधात हे आंदोलन असणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे यांनी प्रश्न विचारला असता, त्यांनी महाविकास आघाडीची पाठराखण केल्याचे दिसले. यावेळी उदयनराजे म्हणाले की, “महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा होणारा अपमान पाहता काही शिवभक्त आहेत. जे एकत्र येत आहेत. तसेच, मविआच्या आंदोलनाकडे राजकीय दृष्टीकोनातून बघणे चुकीचे आहे. तसेच, हा विषय कोणत्या एका पक्षाचा नाही. मात्र सातत्याने शिवरायांचा होत असलेल्या अपमानामुळे महाराष्ट्रातील आणि देशातील शिवभक्त नाराज आहेत. तसेच, शिवरायांचा वारंवार होणाऱ्या अपमानावरून असे वाटायला नको की, हे चालते महाराष्ट्रात, त्यामुळे याला कुठेतरी रोख लागला पाहिजे. तसेच, याकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे”.

- Advertisement -

“आम्ही दाखल केलेल्या तक्रारीची दखल राष्ट्रपती यांनी घेतली आहे. त्यामुळे आता प्रक्रियेनुसार कारवाई होणार आहे. कारण राज्यपाल हे मोठे पद नाही. त्यामुळे आम्ही पत्र व्यवहार केला आहे आणि आता लवकरात लवकर कारवाई होईल”, अशी अपेक्षाही यावेळी उदयराजे भोसले यांनी व्यक्त केली.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात या तीन राज्यांमधील राज्यसभेच्या भाजपाच्या खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला एकूण तीन राज्यांमधील २६ खासदार सहभागी झाले होते. उर्वरित खासदारांची कालांतराने बैठक होणार आहे”, अशी माहिती उदयनराजे भोसले यांनी दिली.


हेही वाचा – गुजरातमध्ये मतदानाची टक्केवारी घसरली, तरीही भाजपाची मतं वाढली

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -