घरमहाराष्ट्रहिंमत असेल तर निवडणुका एकत्र घ्या!, आदित्य ठाकरेंचे सरकारला खुलं आव्हान

हिंमत असेल तर निवडणुका एकत्र घ्या!, आदित्य ठाकरेंचे सरकारला खुलं आव्हान

Subscribe

मुंबई – राज्य सरकारमध्ये हिंमत असेल तर त्यांनी महापालिका आणि विधानसभेची निवडणूक एकत्र घ्यावी, असे आव्हान शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी शिंदे-फडणवीस सरकारला दिले. नवीन वर्षात तरी या गद्दार सरकारने ४० गद्दार आमदारांच्या आणि १३ खासदारांच्या जागी निवडणुका घेण्याची हिंमत दाखवावी, असेही ठाकरे म्हणाले.

हेही वाचा बावनकुळे आक्रमक, आव्हाडांनी ते ट्विट केलं डिलीट; नेमकं प्रकरण काय?

- Advertisement -

अंधेरी पूर्व येथील गुंदवली शाळेतील ज्युनियर-सिनियर केजीच्या नुतनीकरण झालेल्या वर्गाचे उद्घाटन आज आदित्य ठाकरे यांच्याहस्ते झाले. त्यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला राज्यात निवडणुका घेण्याचे खुले आव्हान दिले. महापालिकेच्या निवडणुका घ्या तसेच विधानसभेच्या निवडणुका एकत्र घ्या. पण यांच्यात निवडणुका घेण्याची हिंमत नाही, असे ठाकरे यांनी सांगितले.

आदित्य ठाकरे यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. बेकायदेशीर मुख्यमंत्री स्वतःच्या कामासाठी दिल्लीत जातात, गुवाहाटीला जातात. पण राज्यासाठी कधी ते गेले नाहीत. आपल्याकडे एक सीएम आणि दुसरे सुपर सीएम आहेत, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.

- Advertisement -

हेही वाचा – योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर; आदित्य ठाकरे म्हणतात, आपले सीएम-सुपर सीएम स्वतःसाठी…

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी यावेळी मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल यांच्यावर गंभीर आरोप केला. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीने १ हजार ७०० कोटींची कामे मंजूर केली होती. मात्र ही कामे आयुक्तांनी बदलली, असे ठाकरे म्हणाले. स्थायी समितीने मंजूर केलेली कामे महापालिका आयुक्त अशी बदलू शकतात का? यावर आमचे काम सुरु आहे. खरोखर ७ हजार कोटीची कामे होऊ शकतात आणि जर होत असतील तर मग कल्याण, नागपूरला रस्ते का नाही झाले? यावर आमचा अभ्यास सुरु असून आम्ही कायदेशीर बाबींची पडताळणी करत आहोत, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -