घरमहाराष्ट्रआता एकनाथ खडसे नॉट रिचेबल; राज्याच्या राजकारणात शिजतंय काय?

आता एकनाथ खडसे नॉट रिचेबल; राज्याच्या राजकारणात शिजतंय काय?

Subscribe

Eknath Khadase Not Reachable | राजकराणातील सक्रीय वावर कमी असला तरीही ते आपल्या कार्यकर्त्यांच्या सातत्याने संपर्कात असतात. पंरतु, गेल्या काही दिवसांपासून ते कार्यकर्त्यांना भेटलेच नसल्याचं समोर आलं आहे.

Eknath Khadase Not Reachable | मुंबई – विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या पाच जागांसाठी राज्यातील वातावरण तापलेलं असतानाच राष्ट्रवादीचे ज्येष्ठे नेते आणि विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे नॉट रिचेबल आहेत. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून त्यांचा कार्यकर्त्यांशी काहीच संपर्क झाला नसून ते जळगावात आहेत की मुंबईत हेसुद्धा कळू शकलेलं नाही. त्यामुळे त्यांच्या मुक्ताईनगर मतदारसंघात एकच खळबळ उडाली आहे. टीव्ही ९ ने संबंधित वृत्त दिले आहे.

हेही वाचा – हा कसा फुटला, तो कसा फुटला, मुख्यमंत्र्यांची कॅसेट सुरूच; एकनाथ खडसेंची टीका

- Advertisement -

भाजपामध्ये ४० वर्षे निष्ठा राखलेले एकनाथ खडसे यांनी दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे जळगावातील राष्ट्रवादीची जागा मजबूत झाल्याचं बोललं जात आहे. एकनाथ खडसे राष्ट्रवादीत येताच अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीत आले. दरम्यान, त्यांना विधान परिषदेत संधी मिळाली. परंतु, पक्षात इतर जबाबदारी अद्यापही देण्यात आलेली नाही. त्यामुळे राजकारणात त्यांचा सक्रीय वावर कमी झाला आहे.

राजकराणातील सक्रीय वावर कमी असला तरीही ते आपल्या कार्यकर्त्यांच्या सातत्याने संपर्कात असतात. पंरतु, गेल्या काही दिवसांपासून ते कार्यकर्त्यांना भेटलेच नसल्याचं समोर आलं आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून त्यांच्या जवळच्या कोणत्याच कार्यकर्त्यांशी संपर्क झालेला नाही. त्यांचे दोन्ही मोबाईल क्रमांक नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नक्की काय चाललंय या चर्चांना जोर आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – जमिनीच्या तपासासाठी अधिकारी मुक्ताईनगरमध्ये दाखल, एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढणार

शुभांगी पाटीलही होत्या नॉट रिचेबल

पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज घेण्याची काल शेवटची तारीख होती. नाशिक पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या स्वीकृत उमेदवार शुभांगी पाटील काल सकाळपासून नॉट रिचेबल होत्या. त्यामुळे त्या ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ संपताच शुभांगी पाटील माध्यमांसमोर आल्या आणि आपण मविआच्या पाठिंब्याने लढणार असल्याचे घोषित केले. तसंच, शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -