घरताज्या घडामोडीबाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच मंचावर येणार?

बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच मंचावर येणार?

Subscribe

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची सोमवार 23 जानेवारी 2023 रोजी जयंती आहे. बाळासाहे ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात त्यांच्या तैलचित्राचे अनावरण होणार असून, त्यानिमित्त राज्यातले सगळे दिग्गज एकत्र येणार आहेत. विशेष म्हणजे यावेळी ठाकरे कुटुंबियांनाही या अनावरण सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे.

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची सोमवार 23 जानेवारी 2023 रोजी जयंती आहे. बाळासाहे ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात त्यांच्या तैलचित्राचे अनावरण होणार असून, त्यानिमित्त राज्यातले सगळे दिग्गज एकत्र येणार आहेत. विशेष म्हणजे यावेळी ठाकरे कुटुंबियांनाही या अनावरण सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे उद्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच मंचावर येणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (On Occasion Of Balasaheb Thackeray Birth Anniversary Uddhav Thackeray Eknath Shinde Come Together In Vidhan Bhavan Tomorrow)

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र विधानभवनात लावण्यात येणार आहे. विधिमंडळाकडून या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरु आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यातले सर्व महत्त्वाचे नेते हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर “राज्यातील २८८ आमदार, ७८ विधान परिषदेचे सदस्य यांच्यावतीने हा कार्यक्रम संपन्न होत असल्याने तो सर्वांगीण स्वरुपाचा आहे. त्यामुळे कुणीही कार्यक्रमाची उंची कमी होईल, असे विधान कुणीही करु नये”, असे आवाहन विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले आहे.

- Advertisement -

त्याशिवाय, “सर्वांचा सन्मान होईल त्याप्रमाणे प्रोटोकॉलनुसार योग्य स्थान दिलेले आहे. शिवाय जेवढे नेते व्यासपीठावर असतील त्यांची भाषणं होतील. अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे”, असे राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

दरम्यान, उद्याचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्त्वाचा आहे. कारण बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. तर उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ संपत आहे. महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या व्यासपीठावर आहेत त्याच व्यासपीठावर उद्धव ठाकरे उपस्थित राहतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जर उपस्थित राहिले तर प्रोटोकॉलनुसार त्यांचं स्थान कुठे असेल? असाही प्रश्न सर्वांना पडला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणतात – मी शाळेत गणित, मराठी विषयांत टॉपर होतो…

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -