घरमहाराष्ट्रकसबा, पिंपरीतील पोटनिवडणुकीबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; म्हणाले - बिनविरोध...

कसबा, पिंपरीतील पोटनिवडणुकीबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; म्हणाले – बिनविरोध…

Subscribe

Sanjay Raut on Byelections |महाराष्ट्राची संस्कृती काय आहे, त्या संस्कृतीची कशी पायमल्ली होतेय हे कोणी सांगायला नको. नांदेड आणि पंढपूरमध्ये ही संस्कृती दिसली नाही. अंधेरीत दिसली, पण त्याला वेगळी कारणं होती, असा टोलाही यावेळी राऊतांनी लगावला.

Sanjay Raut on Byelections | मुंबई – लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे पिंपरी आणि कसबा विधानसभेच्या या दोन जागा रिकाम्या झाल्या आहेत. या जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. दरम्यान, अंधेरी पोटनिवडणुकीत ज्याप्रमाणे महाराष्ट्राची परंपरा जपली त्याप्रमाणे कसबा आणि पिंपरीमध्ये महाविकास आघाडीने संस्कृती जपावी असा सूर भाजपाकडून लावला जातोय. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघातून महाविकास आघाडी उमेदवार उभा करणार का असा प्रश्न उपस्थित केला जात असताना संजय राऊतांनी सूचक विधान केलं आहे.

मृत आमदाराच्या जागेवर जर त्यांच्या कुटुंबीयातील उमेदवार पोटनिवडणूक लढवत असेल तर ती निवडणूक बिनविरोध करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. पण अंधेरीची निवडणूक बिनविरोध झाली नाही. तिथे निवडणूक झाली. भाजपा निवडणूक लढला नाही. याठिकाणी भाजपाला जिंकण्याची संधी नव्हती, म्हणून त्यांनी उमेदवारी मागे घेतली, असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा यंदाच्या बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी चांगली तरतूद असेल; मुख्यमंत्री शिंदेंना विश्वास

नांदेड, पंढरपूर या दोन्ही ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या. या दोन्ही ठिकाणी मृत आमदारांच्या घरातील नातेवाईक उभे होते तरी तिथे निवडणुका झाल्या. अंधेरी पोटनिवडणूक अपवाद होता. ती मुंबईत निवडणूक होती. भाजपाला जिंकण्याची अजिबात संधी नव्हती, असं,संजय राऊतांनी स्पष्ट केलं.

- Advertisement -

मात्र, असं असलं तरीही काल रात्री राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील, सुनील तटकरे मातोश्रीवर आले होते. यासंदर्भात काय पावलं टाकायची, कोणता निर्णय घ्यायचा यावर चर्चा झाली आहे. उद्या-परवा पुन्हा चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. निवडणूक लढली तर चिंचवडची जागा शिवसेनेने लढावी असं मत आहे. कसब्याबाबत राष्ट्रवादी-काँग्रस यांच्यात चर्चा होईल, अशा प्रकारचीही चर्चा झाली, यावर निर्णय होईल, असं राऊत म्हणाले.

ही निवडणूक टाळता येईल का यावरही चर्चा झाली आहे. मृत आमदारांच्या घरातील उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे इतर प्रमुख सहकाऱ्यांशी चर्चा केली जाईल. परंतु, निवडणूक लढायला हरकत नाही. जरी आम्ही दूर राहिलो तर ती निवडणूक होणारच आहे. कारण, काही प्रमुख अपक्ष निवडणुकीत उतरतील आणि निवडणूक होईल, असं राऊतांनी सांगितलं.

हेही वाचा -वंचितची युती, पोटनिवडणुकीबाबत राष्ट्रवादीचे नेते घेणार ठाकरेंची भेट

महाराष्ट्राची संस्कृती काय आहे, त्या संस्कृतीची कशी पायमल्ली होतेय हे कोणी सांगायला नको. नांदेड आणि पंढपूरमध्ये ही संस्कृती दिसली नाही. अंधेरीत दिसली, पण त्याला वेगळी कारणं होती, असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -