घरताज्या घडामोडीराजकारणाची दिशा बदलतेय यावर सल्ला काय?, अशोक चव्हाणांनी रविशंकर यांना विचारला प्रश्न

राजकारणाची दिशा बदलतेय यावर सल्ला काय?, अशोक चव्हाणांनी रविशंकर यांना विचारला प्रश्न

Subscribe

महाराष्ट्रातील सध्याचं राजकीय वातावरण पाहता महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमान, राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि शाब्दिक चकमक होताना दिसून येत आहे. या बदलत्या राजकारणावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केलाय. दरम्यान, त्यांच्या या प्रश्नामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

नांदेड येथील मामा चौक मैदानावर आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातर्फे श्री श्री रविशंकर यांचा महासत्संग घेण्यात आला. यावेळी उपस्थितांपैकी काही लोकांनी श्री श्री रविशंकर यांना प्रश्न विचारले. यावेळी अशोक चव्हाणांनी देखील प्रश्न विचारला. सध्याच्या राजकारणात पक्षीय द्वेष वगळून व्यक्तिगत द्वेष पसरवला जात आहे. त्यामुळे व्यक्तींमध्ये मतभेद निर्माण होऊन राजकारणाची दिशा बदलत चालली आहे. यावर गुरुदेव काय सल्ला आहे?, असा प्रश्न चव्हाणांनी विचारला. यावर उत्तर देत रविशंकर म्हणाले की, राजकारणामध्ये वैयक्तिक द्वेष हा असू नये, राजकारणात मतभेद असावेत. तसेच विकासासाठी मतभेद असता कामा नये.

- Advertisement -

सत्ताधारी पक्षासोबतच विरोधी पक्ष सोबत असणे आवश्यक आहे. जनतेच्या हितासाठी राजकीय लोकांनी कामे केले पाहिजे. राजकारणी लोकांनी मतभेद विसरून विकासाची कामे करावी असे त्यांनी सांगितले.

श्री श्री रविशंकर यांनी कार्यक्रमाच्या सुरूवातीला उपस्थितांशी मराठीत संवाद साधला. त्यानंतर हिंदी भाषेत गुरूवाणीला सुरूवात केली. जिथे विश्वास आहे तिथे चमत्कार आहे. जीवनात आदर्श ठेवणे आवश्यक आहे. आज डिप्रेशन, उदासीनता निर्माण होते. ही जीवनात सर्वात मोठी समस्या आहे. ४० सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करत आहे. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य महत्वाचे आहे. मनाला सांभाळणं खूप महत्त्वाचं आहे, असं श्री श्री रविशंकर म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : सत्यजित तांबेंना बाळासाहेब थोरातांचा अप्रत्यक्षरीत्या पाठिंबा, पोस्टरमुळे राजकीय वर्तुळात चर्चा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -