घरताज्या घडामोडीमुंबईत नशेच्या गोळ्यांची तस्करी करणाऱ्या टोळीवर एनसीबीची मोठी कारवाई

मुंबईत नशेच्या गोळ्यांची तस्करी करणाऱ्या टोळीवर एनसीबीची मोठी कारवाई

Subscribe

मुंबईत नशेच्या गोळ्यांची तस्करी करणाऱ्या टोळीवर एनसीबीने मोठी कारवाई केली आहे. मुंबई आणि नवी मुंबई परिसरात विविध ठिकाणी एनसीबीने कारवाई केली. या कारवाईत एनसीबीने 1,32,000 अल्प्राझोलम गोळ्या आणि 2,400 CBCS बाटल्या जप्त केल्या आहेत. तसेच गोळ्यांची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीची माहिती एनसीबीला मिळाल्यानंतर डोंबिवलीत राहणाऱ्या एस. यादव नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एस. यादव मुंबई आणि आजूबाजूच्या भागात नशेच्या औषधांचा पुरवठा करत होता. अधिक चौकशी केल्यानंतर त्याने उत्तर प्रदेश आणि बिहारमधील टोळ्या या नशेच्या औषधांची तस्करी करत असल्याचे यादव याने सांगितले. यावेळी या छापेमारीत पाच कोटी रूपये किमतीच्या नशेच्या गोळ्या आढळून आल्या आहेत.

- Advertisement -

जानेवारी महिन्यात बेकायदेशीर औषधांची मुंबईत विक्री करण्यासाठी एक टोळी येणार होती. परंतु, प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी वाढलेल्या सुरक्षेमुळे तस्करांनी त्यांचे वेळापत्रक काही दिवसांसाठी पुढे ढकलले. प्रजासत्ताक दिनानंतर कुरिअरमार्फत ही औषधे मुंबईत पोहोचली. यावेळी एस. यादव माल घेण्यासाठी तेथे पोहोचला. परंतु एनसीबीच्या अधिकार्‍यांनी त्याला अडवले आणि त्याची चौकशी केली. मात्र, त्याने बेकायदेशीर औषधांचं पार्सल घेण्यासाठी आल्याची कबुली दिली.

- Advertisement -

दरम्यान, पार्सल उघडून पाहिलं असता अल्प्राझोलमच्या 1,32,000 गोळ्या आढळल्या. त्यानंतर अधिकाऱ्यांनी यादवकडून माहिती घेऊन मानखुर्द येथे एक वाहन अडवले. तसेच या वाहनातून देखील अवैध औषधे जप्त करण्यात आली.


हेही वाचा : विधान परिषदेत आमदारकी मिळाली, पण 75 हजार गमावले, नेमकं काय घडलं?


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -