घरमुंबईठाकरे गटाचे सुनील शिंदे आणि सचिन अहिर शिंदे गटात जाणार, आमदार संजय...

ठाकरे गटाचे सुनील शिंदे आणि सचिन अहिर शिंदे गटात जाणार, आमदार संजय शिरसाटांचा दावा

Subscribe

आदित्य ठाकरेंच्या चॅलेंजला त्यांच्याच वरळीतून दमदार प्रत्यूत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तयारीला लागले आहेत.

Sanjay Shirsat on Worli Election: एकीकडे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वरळी मतदारसंघाची निवडणूक लढवण्यासाठी चॅलेंज देत आहेत. दुसरीकडे आदित्य ठाकरेंच्या चॅलेंजला त्यांच्याच वरळीतून दमदार प्रत्यूत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तयारीला लागले आहेत. आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातील ठाकरे गटाचे दोन नेते शिंदे गटात जाण्याची चिन्ह दिसून येत आहेत. असा दावाच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलाय.

आदित्य ठाकरे नाशिकमध्ये शिवसंवाद यात्रेसाठी आले असताना शिंदे गटाने ठाकरे गटाला मोठा धक्का दिलाय. नाशिक जिल्ह्यातल्या अनेक ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुले ठाकरे गटातून शिंदे गटात इनकमिंग सुरूच आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये तिसऱ्यांना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा धक्का ठाकरे गटाला पचवण्यास अवघड जात असतानाच आता वरळी मतदारसंघातून पुन्हा एकदा ठाकरे गटाला मोठा धक्का मिळालाय.

- Advertisement -

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलंय. आज वरळीत शिंदे-फडणवीस शक्तीप्रदर्शन करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आमदात संजय शिरसाट यांनी हे वक्तव्य केलंय. यावेळी बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, “आदित्य ठाकरेंना अहंकार त्यांच्या मानगुटीवर बसलेला आहे. आमदार निघून गेले, पक्ष संपला तरी त्यांच्या अहंकार काही जात नाही. सत्ता गेली तरी अहंकार कमी होत नाही. यात संजय राऊत त्यात पेट्रोल टाकून अंहकार आणखी वाढवतात.”

यापुढे बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, “वरळी मतदारसंघ हा आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ नाही. आदित्य ठाकरेंनी राजकारणातल्या सुरूवातीलाच इथल्या दोन कार्यकर्त्यांच्या छाताडावर पाय ठेऊन पहिली पायरी चढले आहेत. तिथले सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांच्या छाताडावर पाय ठेऊन ते पहिली पायरी चढले आहेत. राजकारणाची एक निवडणूक जिंकले म्हणून आपण सर्वकाही जिंकलं असं आदित्य ठाकरेंना वाटतं.” असं देखील संजय शिरसाट म्हणाले.

- Advertisement -

वरळीतील आमदार संजय शिरसाट यांना थेट मंत्रिपदाची ऑफर देण्यात आल्याचे कळतंय. वरळी मतदारसंघातून २०१९ च्या विधानसभेला उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य यांना उभं करण्याचा निर्णय झाला तेव्हा त्यावेळी सुनील शिंदे हे वरळीचे आमदार होते. आदित्य ठाकरेंसाठी त्यावेळी त्यांनी आपल्या आमदारकीचा मोह आवरला होता. तर राष्ट्रवादीत असलेले सचिन अहिर मैदानात उतरल्यास दगाफटका होऊ शकतो, हे ओळखून अहिर विधानपरिषदेची आमदारकी देऊन निवडणूकीच्या मैदानातून बाहेर आणलं. त्यामुळे वरळी मतदारसंघाचं मैदान मोकळं करून आदित्य ठाकरे या मतदारसंघातून जिंकून आले.

आदित्य ठाकरेंनी दिलेलं चॅलेंज पाहून त्याला उत्तर देण्यासाठी एकनाथ शिंदेंनी धडपड सुरू केलीय. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंना पराभूत करण्यासाठी शिंदे गटाचा मास्टर प्लॅन आखण्यास सुरूवात झालीय. त्यात संजय शिरसाट यांच्या दाव्यामुळे आता यावर खात्री देखील मिळाली आहे. त्यामुळे वरळी मतदारसंघातची निवडणूक ही चर्चेची ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -