घरमहाराष्ट्रअमित शाहांच्या कोल्हापुर दौऱ्यावर राजू शेट्टींची खोचक टीका, म्हणाले, आमच्याकडे तणनाशक...

अमित शाहांच्या कोल्हापुर दौऱ्यावर राजू शेट्टींची खोचक टीका, म्हणाले, आमच्याकडे तणनाशक…

Subscribe

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी (19 फेब्रुवारी) रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यासाठी भाजप आणि शिंदे गटाने कोल्हापूरात मोठी तयारी केली आहे. एका महिन्यात केंद्रातील मोदी सरकारमधील तीन बडे नेते कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दौरे असल्याचं बोललं जात आहे. यासाठी कोल्हापूरातील भाजप कार्यकर्त्यांकडूनही जय्यत तयारी सुरु आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात कोल्हापूरातील अनेक विकासकामांचा आढावा घेतला जाणार आहे.

आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने कोल्हापूरात मोठी तयारी सुरु केली आहे, त्यामुळे शिंदे गटाची धाकधूक वाढली आहे. भाजप मंत्र्यांच्या या कोल्हापूर दौऱ्यावर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी खोचक टीका केली आहे. राजू शेट्टी बुधवारी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

- Advertisement -

अमित शाह यांच्या कोल्हापूर दौऱ्यासंदर्भात आत राजू शेट्टी यांना प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांवर उत्तर देत राजू शेट्टी म्हणाले की, आमच्याकडेही फवारणी असून त्यामध्ये कमळ फुलणार नाही.

दरम्यान कोल्हापूरातील पत्रकार परिषदेत राजू शेट्टींनी स्वाभिमान शेतकरी संघटनेकडून करण्यात येणाऱ्या चक्क जाम आंदोलनाची माहिती देण्यात आली. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून 22 फेब्रुवारी रोजी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग वगळता अन्य मार्गांवर हे आंदोलन केलं जाईल.

- Advertisement -

असा असेल अमित शाहांचा कोल्हापूर दौरा

यापूर्वी 28 जानेवारी रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी गडकरींच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा पार पडला. यानंतर आता भाजपचे चाणक्य मंत्री अमित शाह 19 फेब्रुवारीला कोल्हापूर दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यादरम्यान कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. अमित शाह दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर असून ते कोल्हापूर आधी नागपूर आणि पुण्यातील कार्यक्रमांनाही हजेरी लावणार आहेत.

अमित शाह कोल्हापूरातील न्यू एज्युकेशन सोसायटीच्या शताब्दी सोहळ्याला उपस्थितीत लावणार आहेत. न्यू एज्युकेशन सोसायटीमार्फत प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलसह अनेक शाळा आणि महाविद्यालये चालवल्या जातात. शाह यांच्या पत्नी सोनल शाह देखील 40 वर्षांपूर्वी याच शाळेच्या विद्यार्थिनी होत्या. दरम्यान शाह 19 फेब्रुवारीला कोल्हापूरात येताच महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेत नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. यानंतर नागाळा पार्कमधील पक्ष कार्यालयाच्या परिसरात मंदिराची पायाभरणी करतील, यावेळी भाजपचे स्थानिक नेते यांच्यामार्फत अमित शाह यांचे जंग्गी स्वागत केलं जाईल.


मुंबईत द बर्निंग ट्रेन ! लोकल ट्रेनच्या चाकाला आग, प्रवाशांनी टाकल्या उड्या

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -